Headlines

खुलताबाद उरुसामध्ये कुस्तीचा थरार:291 पहिलवानांनी गाजवला आखाडा




ऐतिहासिक खुलताबादच्या उरुसाचे औचित्य साधून रविवारी आयोजित कुस्ती स्पर्धेत कुस्त्यांची पर्वणी पहायला मिळाली. दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या आखाड्यात परिसरासह जिल्ह्यातून आलेल्या तब्बल २९१ लहान-मोठ्या पहिलवानांनी आपले नशीब आजमावले. स्पर्धेतील सर्वात मानाची आणि थरारक ठरलेली ११ हजार रुपयांची शेवटची कुस्ती सराईचे पहिलवान मुन्ना बाळासाहेब नागे यांनी जिंकली. त्यांनी शिरसळतांड्याचे (सिल्लोड) पहिलवान दीपक चोरमळे यांच्यावर अत्यंत चपळाईने आणि उत्कृष्ट डावपेचांच्या जोरावर मात केली. मुन्ना यांच्या विजयानंतर संपूर्ण मैदानात कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष केला. या सोहळ्याला उरुस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कामरानउद्दीन शेख, नगराध्यक्ष आमेर पटेल, दर्गा कमिटी सचिव मतीन जगीरदार, मुबशीरोद्दीन अमीरेद्दिन, लिपिक आतीफ शेख, जीतेंद्र बोचरे, कासम भाई शेख व लालाखा पठाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या कुस्ती स्पर्धेने खुलताबादच्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिली. १० रुपयांपासून ते ११ हजारांपर्यंतचे सामने या स्पर्धेत १०, २०, ५०, १०० रुपयांपासून ते ५ हजार, ७ हजार आणि थेट ११ हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. अरसलान बशीर शेख आणि शोएब पेंटर या अवघ्या ९ वर्षांच्या बालपहिलवानांनी आखाड्यात उतरून दाखवलेल्या धैर्याने प्रेक्षकांची खास दाद मिळवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *