![]()
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, साहस आणि जबाबदारीची भावना निर्माण व्हावी तसेच त्यांना भारतीय वायुदलातील रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात भारतीय वायुदलातील करिअरच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्श
.
या ऑनलाईन सत्रात लोहेगाव (पुणे) एअर फोर्स स्टेशनच्या फ्लाईंग ऑफिसर मुस्कान सिंह (फ्लायंग पायलट) आणि मास्टर वॉरंट ऑफिसर देवेश कुमार (एज्युकेशन इन्स्ट्रक्टर) यांनी विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केले. एनडीए प्रवेश, स्पर्धा परीक्षांची रचना, मुलाखत व निवड प्रक्रियेसह ‘फ्लाइंग ब्रँच’ आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगद्वारे तांत्रिक क्षेत्रात प्रवेश कसा मिळवावा, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. वायुदलातील जीवन, विमान उड्डाणाचा थरारक अनुभव आणि शिस्तबद्ध दिनचर्या याबद्दल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या शैक्षणिक उपक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल आणि शिक्षण सभापती अनिता मोटे यांनी विशेष प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.