Headlines

मराठी मनोरंजनाचा धमाका!:'दृश्य-अदृश्य'सह ओटीटीवर येणार सिनेमा अन् सीरिजचा तडका; वाचा काय आहे खास!




जर तुम्ही मराठी चित्रपट आणि वेबसीरिजचे शौकीन असाल, तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. ‘अल्ट्रा झकास’ या लोकप्रिय मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, सस्पेन्स आणि कौटुंबिक नाट्याचा भरगच्च भरणा पाहायला मिळणार आहे. या मनोरंजनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे अभिनेत्री पूजा सावंतचा ‘दृश्य-अदृश्य’ हा रहस्यमयी थ्रिलर पट! सोबतच ‘बाई गं’मधून स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे यांची ही भन्नाट कॉमेडी कथाही पाहायला मिळेल. ऑगस्टमध्ये ‘अल्ट्रा झकास’वर काय पाहावे? दृश्य-अदृश्य (वर्ल्ड डिजिटल प्रीमियर – 28 ऑगस्ट): मिलिंद लेले दिग्दर्शित या सस्पेन्स थ्रिलरमध्ये पूजा सावंत, सुव्रत जोशी, अशोक समर्थ, केया इंगळे, अक्षया गौरव आणि हार्दिक जोशी यांची दमदार स्टारकास्ट आहे. गुढ आणि थराराची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट उत्तम पर्वणी ठरेल. इतर रंजक चित्रपट अन् सीरिज टीप: याशिवाय लवकरच ‘रहस्यम’ आणि ‘असावमी’ या दोन नव्या सस्पेन्स वेबसीरिजही अल्ट्रा झकासवर दाखल होणार आहेत. त्यामुळे या वीकेंडला पॉपकॉर्न तयार ठेवा आणि ‘अल्ट्रा झकास’वर मराठी मनोरंजनाचा आनंद घ्या!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *