![]()
रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईत वातावरण तापले असून कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला परप्रांतीय चालकांकडून बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मारहाण करणाऱ्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधी
.
हिंदुस्तान नाक्याजवळ काही अमराठी रिक्षाचालकांनी मराठी सक्तीविरोधात चक्काजाम आंदोलनाचा प्रयत्न केला. या वेळी भाडे घेऊन जाणाऱ्या प्रकाश बंडू शेजवळ या मराठी रिक्षाचालकाला आंदोलकांनी अडवले व रिक्षा बंद करण्यास सांगितले. “आम्ही मराठी आहोत, आम्ही नियमानुसार रिक्षा चालवणार, अशी भूमिका शेजवळ यांनी घेताच संतप्त ४ ते ५ परप्रांतीय चालकांनी त्यांना मारहाण केली. यात शेजवळ यांच्या ओठाला दुखापत झाली.
संजय निरुपम यांची मुदतवाढीची मागणी
या बैठकीत शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उर्वरित १५ टक्के अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर सरनाईक यांनी कायदा हातात घेऊ नये, असा इशारा दिला.
मारहाण करणाऱ्यास मनसेने पकडून दिले
मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीला शोधून कांदिवली पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी शिकण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली
मंत्रालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “१९८९ चा नियम आहे, ३६ वर्षांत जे शिकले नाहीत त्यांच्यासाठी कायद्यात आता १ महिना आणि नंतर ३ महिने अशी एकूण ४ महिन्यांची मुदत मराठी शिकण्यासाठी दिली आहे. १२ ऑगस्ट २०२६ च्या जीआरनुसारच कारवाई होईल. कोणावरही बेकायदेशीर कारवाई होणार नाही, पण जर कोणी मुजोरी दाखवत’ मराठी बोलणार नाही, अशा धमक्या देत असेल तर ती मुजोरी परिवहन विभाग खपवून घेणार नाही.
मुंबईत मराठी-अमराठी समोरासमोर आल्याने वाद चिघळला
गरज भासल्यास भाषा शिकण्यासाठी आणखी वेळ देऊ : परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय रिक्षाचालकांना सरकारकडून कोणताही त्रास दिला जात नाही. त्यांना मराठी भाषेचे तज्ज्ञ होण्यास सांगितलेले नसून प्रवाशांशी दैनंदिन संवादापुरती जुजबी मराठी बोलता यावी एवढीच माफक अपेक्षा आहे. गरज भासल्यास भाषा शिकण्यासाठी आणखी वेळ वाढवून देण्यास तयार आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री