Headlines

Sufficient sugar stock in the country, prices will come down, according to the Indian Sugar and Bio-Energy Manufacturers Association.


  • Marathi News
  • National
  • Sufficient Sugar Stock In The Country, Prices Will Come Down, According To The Indian Sugar And Bio Energy Manufacturers Association.

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात साखरेचा तुटवडा नाही. व्यापाऱ्यांवर साठवणूक मर्यादा आणि आयातीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर साखरेचे दर कमी होण्याची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली आहे.

‘इस्मा’चे अध्यक्ष नीरज शिरगावकर म्हणाले, हवामानातील बदल, कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे साखरेचे दर वाढले. मात्र, पुरवठ्याची कमतरता नाही. २०२५-२६ मध्ये साखर उत्पादन २७९ लाख टन राहण्याचा अंदाज असून मागणी २८०-२८५ लाख टन असू शकते. सप्टेंबरअखेरीस ३५ लाख टन साठा शिल्लक राहील, जो देशांतर्गत मागणीसाठी पुरेसा आहे. १० लाख टन आयात परवानगी व साठवणूक मर्यादेमुळे दर कमी होत आहेत. यंदा गाळप हंगाम १५ दिवस आधी सुरू होऊन मुबलक साखर मिळेल.

उसाचा मोठ्या प्रमाणात इथेनॉलसाठी वापर

ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनच्या मते, देशात गेल्या वर्षी ७२० कोटी लिटर इथेनॉल बनले. यासाठी १.३३ कोटी टन धान्य आणि २५ लाख टन साखर बनवण्यायोग्य ऊस-मळी लागली. यात ३४ लाख टन ऊस होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *