Headlines

BJP Leader Navnath Ban Slams Uddhav Thackeray & Sanjay Raut


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांवर भाजपने जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला नाकारले असून आता या गटाने राजकीय गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, असा दावा भाजपचे म

.

संजय राऊतांनी दुकान आवरायला सुरुवात करावी

ठाकरे गटावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाला आवरले आहे. या गटाला घरात बसवण्याचे काम जनतेने केले आहे. आता संजय राऊतांनी आपले दुकान आवरायला सुरुवात करावी.” संजय राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार असल्याचा संदर्भ देत बन यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवरही भाष्य केले. २०२८ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर राऊत यांना पुन्हा राज्यसभेत जाता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. “2028 ला तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीचा गाशा गुंडाळून तुम्हाला महाराष्ट्रात यावे लागेल,” असे म्हणत बन यांनी राऊतांवर टीका केली.

विधान परिषदेतही संधी मिळेलच असे नाही

संजय राऊत यांना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विधान परिषदेची संधी मिळेलच असे नाही, असा टोलाही नवनाथ बन यांनी लगावला. राऊत यांना पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय व्हावे लागेल, असा दावा करत त्यांनी सामना कार्यालयाचा उल्लेख करत बोचरी टीका केली. राऊत यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करताना बन यांनी त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटातील आधीपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना या वक्तव्यामुळे आणखी धार येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य

नवनाथ बन यांनी केवळ संजय राऊत यांच्यावरच टीका केली नाही, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले. “आदित्य ठाकरेंची आवराआवर करा, उद्धवजी ठाकरेंची आवराआवर करा,” असा टोला त्यांनी लगावला. 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मातोश्रीमध्येच बसावे लागेल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना त्यापलीकडे फारसे स्थान उरणार नाही, असेही बन म्हणाले. “गाशा गुंडाळण्याची सुरुवात संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी करावी,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार राजकीय हल्ला चढवला.

2029ची निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढू

दरम्यान, नवनाथ बन यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीबाबत भाजपची भूमिका असल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. “देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे सक्षम नेते आहेत. 2029ची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढली जाईल आणि आम्ही ती जिंकू,” असे बन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या नेतृत्वाचा मुद्दा आतापासूनच राजकीय चर्चेत आला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.

राऊत विरुद्ध महायुतीतील नेत्यांमध्ये संघर्ष कायम

संजय राऊत हे महायुती सरकार आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. सरकारच्या निर्णयांपासून ते भाजपच्या राजकीय धोरणांपर्यंत विविध मुद्द्यांवर राऊत आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्याला प्रत्युत्तर देताना महायुतीतील नेतेही राऊत यांना लक्ष्य करत आहेत. नवनाथ बन यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या संघर्षात आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. विशेषतः २०२८मधील राज्यसभा कार्यकाळ, २०२९ची विधानसभा निवडणूक आणि ठाकरे कुटुंबीयांचे राजकीय भवितव्य या तीन मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मात्र, संजय राऊत किंवा ठाकरे गटाकडून नवनाथ बन यांच्या या ताज्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्याची आवराआवर: कुंभमेळ्याच्या निधीत 27 कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मोदी सरकारसह सरन्यायाधीशांवर निशाणा

नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, त्याआधी ते राज्यातील प्रलंबित कामे उरकून आपली माणसे महत्त्वाच्या पदांवर बसवण्याची आवराआवर करत असल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार, विमानतळांचे खासगीकरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.