Headlines

हिंगोलीत पोलिसांचा घरावर छापा:4.71 लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील बावनखोली भागात पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ४.७१ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील बावनखोली परिसरात एका टिनपत्र्याच्या घरामध्ये शेख फरदीन याने प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवला असून सदर गुटखा तो शहरातील इतर ठिकाणी विल्हेवाट लावणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कुमार मस्के, जमादार सुनील अंभोरे, शेख मोहसीन, दिलीप लेकुळे, गणेश लेकुळे, बाबासाहेब कांबळे, आकाश भुतेकर, आकाश इंगोले, महिला पोलीस कर्मचारी विमल होगे यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांच्या पथकाने घरात तपासणी केली असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोत्यात प्रतिबंधित पान मसाला व तंबाखू व गुटखा आढळून आला. पोलिसांनी पोत्याची पाहणी केली असता त्यात केसरयुक्त विमल पान मसाला, प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला, आर के पान मसाला, के.एम जाफरानी जर्दा आणि व्ही एक तंबाखूचा समावेश आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटखा व पानमसाल्याची किंमत ४.७१ लाख रुपये असल्योच स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिस छापा टाकण्यासाठी येणार असल्याची खबर लागताच शेख फरदीन हा पळुन गेला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *