![]()
मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे सुमारे ४० मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी अधिक तीव्र झाले. आंदोलनाच्या बाराव्या दिवसापर्यंत चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
.
उपोषणकर्ते राजाराम पाडवी बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांत प्रवेश आणि वास्तव्याकरिता लागू करण्यात आलेली ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
डीबीटी रकमेत वाढ करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी ५ आणि १४ ऑगस्ट २०२६ रोजी वसतिगृहांबाबत काढलेले जाचक आदेश रद्द करून २०११च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, रिक्त असलेली १२ हजार ५०० पदे भरावीत, पेसाअंतर्गत भरती प्रक्रिया राबवावी, डीबीटी रकमेत वाढ करावी आणि विद्यार्थ्यांना संगणक व बसपास द्यावेत, अशा प्रमुख मागण्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसतिगृहे उभारणे, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.