Headlines

सावत्र वडिलाकडून भिकेसाठी मुलींना अपंग‎ बनवण्याचा प्रयत्न; चिमुकलीला दिले चटके‎:लातुरात गांधी चौक पोलिस, महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे दोघींची सुटका‎



पोटाची भूक भागवण्यासाठी भीक ‎मागणाऱ्या चिमुकल्यांकडे पाहून‎ माणुसकी जागी व्हावी, अशी ‎अपेक्षा असते. मात्र, लातूरमध्ये‎ अधिक भीक मिळावी आणि ‎त्यातून जास्त पैसे मिळवता यावेत‎ म्हणून दोन चिमुकल्या मुलींनाच‎ अपंग बनवण्याचा अमानुष प्रयत्न‎ झाल्याचा धक्काद

.

लातूर शहरात भीक ‎मागण्यासाठी एका मशिदीसमोर ‎बसवण्यात आलेल्या तीन वर्षांच्या‎ चिमुकलीची अवस्था पाहून ‎उपस्थितांचे ही काळीज पिळवटून‎ गेले. तिच्या डोळ्याला, डोक्याच्या ‎कवटीला तसेच शरीराच्या विविध ‎भागांवर गंभीर दुखापती आढळून‎ आल्या. मारहाणीमुळे तिच्या‎ शरीरावर जखमांच्या खुणा‎ असल्याचे समोर आले. घटनेची‎ माहिती महिला व बालविकास ‎विभागाला मिळताच बाल संरक्षण‎ अधिकाऱ्यांच्या पथकाने ‎घटनास्थळी धाव घेतली.‎

इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग केला‎

एक महिला तिच्या जखमी मुलीला घेऊन शहरातील‎ एका मशिदीच्या आवारात भीक मागत असल्यामुळे ‎माहिती चाइल्ड लाइनला मिळाली होती. त्यांनी या‎ मुलीची सुटका केल्यानंतर चौकशी अंती मुलीचे सावत्र ‎वडिल या मुलीला भीक मागण्यासाठी बेदम मारहान करुन ‎अपंग बनवल्याचे समोर आले. झीरो ने गुन्हा दाखल करुन‎ तो इतवारा पोलिस ठाणे नांदेड येथे वर्ग करण्यात आला‎ – सुनिल रेजीतवाड, पोलिस निरीक्षक‎

लातूर, नांदेड येथून दोघींची केली सुटका‎

चिमुकल्यांना भीक मागण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न ‎अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी मुलीची वैद्यकीय तपासणी‎ करण्यात आली असुन तिच्यावर आता उपचार करण्यात ‎येत आहेत. या मुलीची मोठी बहिण नांदेड शहरात अशाच‎ अवस्थेत आढळल्यामुळे तिचीही सुटका करण्यात आली.‎ – धम्मानंद कांबळे, बाल संरक्षण अधिकारी, लातूर‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *