![]()
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ओंकारनगर प्राथमिक शाळेला इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने बागकामाचे विविध साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये खुरपे, टिकाव, फावडे, कुऱ्हाड, पा
.
ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे व सहशिक्षिका वृषाली गावडे हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षी शाळेच्या परसबागेत विविध भाज्यांची लागवड करतात. या उपक्रमामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना पालेभाज्यांची लागवड, त्यांची वाढ तसेच उत्पादनासाठी लागणारा कालावधी याची प्रत्यक्ष माहिती मिळते. परसबागेत पिकणाऱ्या भाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठीही केला जातो. विशेष म्हणजे शाळेतील इको क्लबचे विद्यार्थी परसबागेच्या देखभालीसाठी आवश्यक सर्व कामे करतात. या उपक्रमाची दखल घेत ओंकारनगर शाळेला शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत सलग दोन वेळा अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया म्हणाल्या, “शाळेच्या परसबागेसाठी यापुढेही आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देऊ. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्यासह ग्रंथालयातील पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येतील.” वैजयंती जोशी व हेमा लुनिया यांनीही विद्यार्थ्यांचे, स्वच्छ परिसराचे आणि शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. इनरव्हील क्लबच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून शाळेला विविध प्रकारची मदत केली जात आहे. क्लबच्या सदस्या शाळेतील विविध उपक्रमांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करतात, असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सांगितले.