अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प
.
‘शेतकरी आई-वडिलांनी उसने पैसे आणून मुलांना शिकायला पाठवले’
विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडताना रोहित पवार म्हणाले, “येथे तयारी करणारे अनेक विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आज १०-१२ वर्षे उलटूनही सोयाबीन आणि कापसाचे भाव तेच आहेत, पण महागाई प्रचंड वाढली आहे. चहा आणि पोह्यांच्या किमतीही तिप्पट झाल्या आहेत.”
“तुमचे आई-वडील स्वतःच्या गरजा मारून, कुठूनतरी उसने पैसे आणून तुम्हाला शिकण्यासाठी इथे पाठवतात. तुमच्या शिक्षणाची फी भरतात. तुमची आणि तुमच्या आई-वडिलांची ही स्वप्ने अशी पेपरफुटीमुळे धुळीस मिळवणे हे पाप आहे. तुम्हाला न्याय मिळावा म्हणूनच आम्ही हा लढा उभा केला आहे.”
“मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यांसकटच बोलतो. पण मी आवाज उठवला की मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते.”
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी 1 सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’
एमपीएससी आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी थेट अध्यक्षांना लक्ष्य केले. “एमपीएससीचे अध्यक्ष हे एका ‘फार मोठ्या नेत्याचे’ मित्र आहेत. ते जेव्हा आरटीओ (RTO) चे कमिशनर होते, तेव्हा त्यांनी काय काय गोंधळ घातला याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अशा अधिकाऱ्याला जर तुम्ही अध्यक्ष बनवत असाल, तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही.”
“एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी या गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी घेऊन तातडीने राजीनामा द्यावा. जर त्यांनी वेळेत राजीनामा दिला नाही, तर येत्या १ तारखेला आम्ही आयोगाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करू आणि त्यांना जाब विचारायला तिकडे येऊ.”

ऑनलाईन परीक्षा नको, ऑफलाईनच घ्या!
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचा आणि आपला एमपीएससी संस्थेवर विश्वास आहे, परंतु सध्याच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील कारभारावर नाही. “या आधीही जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, तलाठी, म्हाडा, एसआरपीएफ आणि एमएमआरडीए अशा अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. आता ऑफलाईन पेपर फुटला म्हणून सरकार जर ऑनलाईन परीक्षांचा घाट घालत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही. कारण ऑनलाईन परीक्षांमध्येही मोठे गैरप्रकार होतात. आम्हाला एमपीएससीमार्फत आणि स्वच्छ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ऑफलाईन परीक्षाच हवी आहे.”
अन्न व औषध प्रशासन (FDA) पेपरफुटी आणि पुढील लढा
“आधी सरकार आणि अधिकारी म्हणत होते की एफडीएचा पेपर फुटला नाही. मात्र, आम्ही पुरावे दिल्यानंतर आणि अल्टीमेटम दिल्यानंतर अखेर त्यांना मान्य करावे लागले. या पेपरफुटीमध्ये ३ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर नेमके कोणते एफआयआर दाखल झाले आहेत, ते समोर आले पाहिजे.”
“नीट (NEET) परीक्षेबाबत मी जास्त बोलणार नाही, पण या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे एका मोठ्या नेत्याला घरी बसावे लागले आहे,” असा चिमटाही त्यांनी काढला. दरम्यान, याच औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकारांबाबत विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती, तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातही एका विद्यार्थिनीने हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता.
हेही वाचा…
कुंभमेळ्याला 35 हजार कोटी, पण रुग्णालयांना निधी नाही:अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशावरही सूचक वक्तव्य

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. “एकीकडे कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी रुपये खर्च केले जातात, पण राज्यातील आरोग्य आणि शिक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. हे सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी पूर्णपणे असंवेदनशील झाले आहेत,” असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रुग्णालयातील ढिसाळ कारभार, सदोष व्हेंटिलेटर आणि सरकारची उदासिनता यांवरून प्रशासनाला खडे बोल सुनावले. येथे वाचा संपूर्ण बातमी