![]()
फुलंब्री पावसाळ्याचा तिसरा महिना म्हणजेच ऑगस्ट संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. अवघा एक महिना पावसाचा शिल्लक राहिल्याने संपूर्ण तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून ६५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. पि
.
या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाने फुलंब्री तालुक्यात हुलकावणी दिली आहे. तालुक्याची जीवनवाहिनी असलेली मुख्य गिरजा नदी अद्याप कोरडीच असून, लघु व मध्यम प्रकल्प तसेच पाझर तलावांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही. नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नसल्याने भूजल पातळी कमालीची खाली गेली आहे. परिणामी, ग्रामीण भागातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तीव्र संकट उभे ठाकले आहे.
पावसाअभावी शेतात सुमारे ५६ हजार हेक्टरवरील पिके सध्या तीव्र धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पिकांना जगवण्यासाठी शेतकरी ओलिताची धडपड करत आहेत. बागायती क्षेत्रात थोड्या प्रमाणात ठिबकच्या साहाय्याने शेतकरी पिकांना पाणी देत आहे, तर कोरडवाहू क्षेत्रातील पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
एकीकडे विहिरी कोरड्या आणि दुसरीकडे प्रकल्प रिकामे, अशा दुहेरी संकटात फुलंब्री तालुक्यातील शेतकरी अडकले आहेत. तालुक्याची जीवनवाहिनी असलेली मुख्य गिरजा नदी अद्याप कोरडीच असून, लघु व मध्यम प्रकल्प तसेच पाझर तलावांमध्ये पाण्याचा थेंबही साचलेला नाही. नदी-नाल्यांना एकदाही पूर आला नसल्याने भूजल पातळी कमालीची खाली गेली आहे. फुलंब्री तालुक्यातील मुख्य नदी असलेली गिरजा नदी कोरडे असून पात्रात असे गवत उगले आहे.