Headlines

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह भाजपनेच धरला; 'उबाठा'च्या पोटात का दुखतंय?:अकाली दलाची चिंता सोडून स्वतःचा पक्ष वाचवा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सल्ला




महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय भाजपने केला आहे. रिक्षाचालकांना संधी दिली पाहिजे तर ते मराठी शिकतील. ज्या राज्यात जातो तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे असा आग्रह प्रत्येक राज्याचा असतो मग महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हा आम्ही आग्रह केला म्हणून उबाठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, अकाली दलाने काय केले पाहिजे हा निर्णय घेण्यासाठी त्यांचे नेते सक्षम आहेत. पण मविआमध्ये काँग्रेस तुमच्यासोबत आहे का ते पाहा. मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसने तुम्हाला बाजूला करत निवडणूक लढवली. राहुल गांधी यांचा पुण्यात कार्यक्रम झाला ना तिथ संजय राऊत यांना बोलावले होते, ना उद्धव ठाकरे यांना बोलावले ही तुमची आघाडी आहे. पंजाबमध्ये आम्हाला 5 नाही तर 50 जागा मिळतील पण तुम्ही तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या. उबाठाचे आमदारही सोडून जातील नवनाथ बन म्हणाले की, येणाऱ्या काळात संजय राऊत यांना रिक्षातूनच फिरावे लागणार आहे. त्यांच्याकडे जो खासदारांचा आकडा आहे, कारण त्यांना रिक्षाचाच परवाना मिळणार आहे. आता तुम्हाला रिक्षात फिरल्याशिवाय पर्याय नाही. आता तुमचे आमदार देखील सोडून जातील. आता त्यांच्याकडे 5 जणच राहतील. रिक्षापेक्षा जास्त तुमची कुवत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. ..तर तुमची गंटार गंगा बंद झाली असती नवनाथ बन म्हणाले की, अमेरिकेत आणि भारतामध्ये विचार स्वतंत्र आहे. देशात जर विचार स्वतंत्र नसते तर तुम्ही रोज सकाळी 10 वाजता जी गटार गंगा वाहता ती सुरूच राहिली नसती. हुकुमशाही काय असते ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना जाऊन विचारले पाहिजे. एखादी चुकीशी गोष्ट झाली तर कशी हुकुमशाही केली जा होती. टीका करणाऱ्यांचा डोळा फोडला गेला, पत्रकारांना अटक करण्यात आली ती हुकुमशाही होती. राऊतांना पाकिस्तानातूनच आमंत्रण येईल नवनाथ बन म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. भागवत यांना अमेरिकेत बोलवले जात आहे. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह राऊतांना पाकिस्तानमध्ये बोलावले जात आहे. तुम्ही पाकमध्ये जात भाषण केले पाहिजे, कारण तुम्हाला जागतिक व्यासपीठावर तुम्हाला किंमत नाही. तुमची धाव पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये बोलावले जावू शकते. कारण त्यांचे विचार एकच आहेत. त्यांना अमेरिकेत बोलावले जाणार नाही. उगाच पोटदुखी होऊ देऊ नका. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत पाकिस्तानमध्ये जाऊन काय सांगणार त्यांचे पाकवर जास्तच प्रेम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *