Headlines

पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात:डिव्हायडरला धडकून खड्ड्यात कोसळली, दोघांचा मृत्यू




पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वाकसई गावाच्या हद्दीत एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक जखमी झाला आहे. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.१२ वाजण्यापूर्वी सूरज ढाब्यासमोर घडला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी, ता. हवेली) हा मारुती सुझुकी कंपनीची कार (एमएच १२ एमबी ६५४१) घेऊन जात होता. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात कारमधील हुसैन शेख आणि आसीर इनामदार या दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांचा सविस्तर पत्ता अद्याप समजू शकलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कारचालक अनिकेत बरवा यालाही दुखापत झाली असून अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ भास्कर खेडकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत बरवा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि अन्य काही कारणे होती का, याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. हेही वाचा.. श्रावणात मटणाच्या मागणीवरून वाद, वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू: वारजे माळवाडीत आई-वडील अटकेत, पुरावे नष्ट केल्याचा आरोप पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात श्रावण महिन्यात मटणाच्या मागणीवरून झालेल्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा जीव गेल्याचा आरोप असून, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *