![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सरकारच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. ‘आठ दिवसांत अर्ज करा, तात्काळ कारवाई होईल’ कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपाबाबत माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, “आतापर्यंत सापडलेल्या नोंदींचा विचार केला, तर केवळ 0.3 टक्केच नोंदी नाकारण्यात आल्या आहेत. बहुतांश लोकांच्या नोंदी ग्राह्य धरून त्यांना प्रमाणपत्रे दिली जात आहेत. ज्या नागरिकांकडे कुणबी असल्याच्या नोंदी आणि पुरावे आहेत, मात्र तरीही त्यांना प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत, अशांनी तात्काळ पुढील आठ दिवसांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत. या अर्जांवर तात्काळ कारवाई करून त्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.” ५८ लाख नोंदींबाबत सरकारची स्पष्ट भूमिका मराठवाड्यात आणि राज्यात सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. “या ५८ लाख नोंदींमधून जे नागरिक प्रमाणपत्रासाठी अर्ज करतील, त्या सर्वांना दाखले (प्रमाणपत्रे) देण्यास सरकार पूर्णपणे तयार आहे,” अशी ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली. ‘जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, हीच विनंती’ मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी उपोषणाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, “शासनाच्या बाजूने आम्ही जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे. ज्या ज्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक होते, ते शासनाने केले आहे. त्यांनी केलेल्या बहुतांश मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत, किंबहुना दोन गोष्टी जास्तच दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी २९ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण करू नये, हाच सरकारचा आग्रह आणि त्यांना नम्र विनंती आहे.” उद्या रक्षाबंधन असल्याने प्रशासकीय बैठक होणार नाही, मात्र प्रशासकीय पातळीवर प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश या बैठकीतून देण्यात आले आहेत. हेही वाचा.. नेपाळ सीमेपासून 18 किमीवर तलाव बनला: चीनने दिला पुराचा इशारा; 359 मृतदेह सापडले, 288 भारतीयांसह 1500 बेपत्ता नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर, आणखी एका मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. चीनने दिलेल्या वृत्तानुसार, रसुवागढी सीमेपासून १८ किलोमीटर वरच्या बाजूस असलेल्या ल्हेंडे नदीत पाणी साचल्यामुळे एक तलाव तयार झाला आहे. पाण्याची पातळी वाढत असून, हा तलाव फुटण्याचा धोका आहे. नेपाळच्या जल आणि हवामान विभागाने भोटेकोशीच्या खालच्या भागातील लोकांना नदीकिनारी न जाता सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. हा तलाव अंदाजे ०.११ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. जर तो फुटला, तर भोटेकोशीमध्ये पुन्हा एकदा भीषण पूर येऊ शकतो. सविस्तर वाचा
Source link
पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसांत अर्ज करावेत:तात्काळ दाखले देऊ, विखे पाटलांचे आवाहन; मनोज जरांगेंना केली उपोषण मागे घेण्याची विनंती