Headlines

वेरूळ येथे 300 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता:चार तास चालले महास्वच्छता अभियान, विविध शासकीय विभागांनी नोंदवला सहभाग‎




ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर आणि परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न ठेवण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ मंदिर परिसर – सुंदर वेरूळ, आरोग्य संपन्न वेरूळ’ हा संदेश देत ३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चार तासांचे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत शिक्षण विभागाने वेरूळ लेणी परिसर, तर महसूल विभागाने घृष्णेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता केली. तसेच इतर शासकीय विभागांनी लेणी ते भोसले चौकापर्यंतचा परिसर स्वच्छ केला. या यशस्वी अभियानानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी सर्वांचे कौतुक करत स्वच्छता केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता नियमित राखण्याचे निर्देश दिले. वेरूळ परिसरामधील स्वच्छता मोहीम केवळ फोटोपुरती नको एकलव्य संघटनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष हितेश रमेश ठाकरे यांनी या मोहिमेवर टीका केली. २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदारांच्या उपस्थितीत झालेली ही मोहीम केवळ फोटोसेशनपुरती मर्यादित होती. मुख्य रस्त्यावरील कचरा उचलल्याव्यतिरिक्त गाव आणि लेणी परिसर जैसे थे आहे, असा आरोप त्यांनी केला. वेरूळमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असताना कायमस्वरूपी सफाई कर्मचारी, डम्पिंग यार्ड व वाहनांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *