![]()
मासिक पाळीतील 4 दिवसांच्या सुट्या पडल्या तर प्रत्येकी 2 हजारांचे नुकसान होते. मुकादम थेट एक दिवसाचे 500 रुपये कापतात. हा भुर्दंड टाळण्यासाठी आणि पाळीतून कायमची सुटका व्हावी म्हणून बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला ऐन तारुण्यातच स्वतःचे गर्भाशय काढून टाकतात. साडेतीन वर्षांत एकट्या बीड जिल्ह्यातील तब्बल 4,613 महिलांनी गर्भाशय काढण्याची (हिस्टेरेक्टॉमी) शस्त्रक्रिया केली. सरकारच्या मते त्यापैकी पक्त 291 महिलाच ऊसतोडणीवरील होत्या. पण धक्कादायक बाब म्हणजे किमान 4 हजार ऊसतोड महिलांनी साडेतीन वर्षात गर्भाशय काढले तर 8 वर्षांत ही संख्या 8,250 आहे. ‘दिव्य मराठी’ने 9 तालुक्यांची पाहणी केली. त्यातून ही बाब उघडकीस आली आहे. 3 वर्षांत तिपटीने वाढल्या शस्त्रक्रिया
वर्ष एकूण ऊसतोड खाजगी शस्त्रक्रिया महिला रुग्णालयांत
2023-24 1,368 77 77
2024-25 1,131 78 70
2025-26 1,529 119 81
2026 जुलै 608 17 06
एकूण 4,613 291 234
(स्रोत : बीड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय) हार्वेस्टरमुळे कामाचे दिवस घटले, मजूर तेवढेच गेल्या 5-6 वर्षांत हार्वेस्टर यंत्रांमुळे मजुरांचे कामाचे दिवस घटले आहेत. मुकादम यंत्राची भीती दाखवून मजुरांकडून अधिक काम घेतात. मजूर पळवापळवीच्या भीतीने मजुरांना 15-20 दिवस आधी नेऊन बसवतात. या बसपाळीचे पैसे दिले जात नाहीत. ऊसतोड महामंडळाने अनुदानाची घोषणा केली तरी प्रत्यक्ष मदत मिळत नाही. -मनीषा तोकले, महिला ऊसतोड कामगार संघटना थेट सवाल डॉ. सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक बीडबाहेर गर्भाशय काढत असतील तर आम्ही काहीच करू शकत नाही
तुमची पूर्वपरवानगी घेण्याच्या सक्तीमुळे शस्त्रक्रिया घटल्या का..? -होय, आकडेवारीवरून घसरण झाल्याचे दिसते. बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन गर्भाशय काढले जात असेल तर..? – त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. बीडमध्येसुद्धा रेकॉर्ड न ठेवता खाजगी रुग्णालये गर्भाशय काढून घेतात त्याचे काय? – असे होऊच शकत नाही. आम्ही आकस्मिक भेटी देऊन रेकॉर्ड चेक करत असतो. दीडपट प्रमाण वाढल्याचे दिसते आहे? – त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही.
Source link
बीडमध्ये एका गर्भाशयाची किंमत फक्त 2000 रुपये:मासिक पाळीत सुट्या घेणे टाळण्यासाठी ऊसतोड महिला ऐन तारुण्यात काढून टाकतात स्वत:चे गर्भाशय