Headlines

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी:अक्कलकोटमध्ये 50 हजार जणांनी घेतले दर्शन




येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. २८ ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त ५० हजार पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर , अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ , राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे चार ते सहा हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी , गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती. श्रावण महिना सुरू असल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शनिवार, रविवार व सोमवार सलग सुट्टी असल्याने भाविकांची संख्या वाढली. सुट्टीमुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करण्यात आले. भाविक धार्मिक पर्यटनांचा कुंटुंबियासह लाभ घेतला. अक्कलकोट तीर्थक्षेत्र ^पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र रांग होती. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. – महेश इंगळे, अध्यक्ष, देवस्थान सेल्फी, फोटो भाविकांसाठी गर्दी वटवृक्ष मंदिरातील इतिसाहिक वटवृक्ष, रुद्राक्ष स्वामी चित्र, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ प्रांगणातील अजानबाहू स्वामीची मूर्ती, स्वामी वाटिका, शिवसृष्टी, गणेश मंदिर, तुळजाई मंदिर, समाधी मठ, चोळप्पा महाराज यांचे घर, विहीर, पादुका, स्वामीच्या वापरलेल्या वस्तु या ठिकाणी फोटो व सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *