Headlines

शांतता, ज्ञानाचा प्रकाश अन् बंधुभावाचा संदेश; ईद-उल-मिलादुन्नबीचा जल्लोष:मोहम्मद पैगंबर यांनी सन्मानाचा मार्ग दाखवला- आ. खोडके‎




हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवजातीला सत्य, न्याय, करुणा आणि परस्पर सन्मानाचा मार्ग दाखविला. त्यांच्या शिकवणुकीतून समाजात शांतता, सद्भावना आणि एकोपा निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा जन्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर ठरला, म्हणूनच जीवनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झालेल्या चुकांची क्षमायाचना करून सदाचाराचा मार्ग अवलंबित सर्वानी विकासाच्या ध्येयाने प्रेरीत होऊन समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन आमदार सुलभा संजय खोडके यांनी केले. सालाबादाप्रमाणे ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व साजरा करण्यात आला. शहराच्या मुस्लिम बहुल भागातही जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीचा उत्साह दिसून आला. याप्रसंगी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके व विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन अनुयायांसमवेत समरस होऊन ईद-ए-मिलादचा आनंद द्विगुणित केला. ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व हा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचा पर्व असून समाजाला अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा पर्व आहे. शांती, सभ्यता, नीतिमत्ता व मानवतेची शिकवण देणारा हा एक लोकोत्सव आहे. ईद-ए-मिलादच्या या पवित्र पर्वातून प्रेम आणि एकतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, तसेच सर्व धर्मीयांमध्ये बंधुभाव अधिक दृढ व्हावा, अशी सदिच्छा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केली. दरम्यान ईद-ए-मिलादुन्नबीच्या पर्वावर मरकज मस्जिद मिस्कीन शाह मियाँ येथून जुलूस काढण्यात आला. दरम्यान चांदनी चौक परिसर स्थित आमदार – सौ.सुलभाताई खोडके जनसंपर्क कार्यालय समीप या शाही जुलूसचे आगमन झाले असता आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांनी मुस्लिम धर्माचे मौलवी यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करीत आशीर्वचन घेत त्यांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या पावन पर्वावर शुभेच्छा दिल्या. विश्व कल्याणाची मनोकामना यासोबतच पारंपारिक पद्धतीने वेशभूषा धारण केलेल्या चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांना सुद्धा आमदार खोडके दाम्पत्यानी यावेळी शुभेच्छा दिल्या. हा जुलूस मार्गक्रमण करीत असतांना जागोजागी पुष्पवृष्टी करीत सहभागी अनुयायांचे स्वागत करण्यात आले. तसेच या पावन पर्वावर सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देत ईद-ए-मिलादुन्नबी च्या हर्षदायी पर्वात सहभागी विश्व कल्याणाची मनोकामना केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *