Headlines

'सीजेपी'नंतर आता 'एसएफआय’चे राज्यात‎ 'शाळा वाचवा, शाळा सुधारा’ आंदोलन‎:1 सप्टेंबरपासून प्रारंभ, शिक्षकदिनी शासकीय कार्यालयांत भरवणार शाळा‎




महाराष्ट्रासह देशभरात कॉक्रोच‎जनता पार्टीने शाळांच्या‎दुरवस्थेबाबत स्कूल ठीक करो‎आंदोलन सुरू केलेले असतानाच‎आता ‘सीजेपी”पाठोपाठ‎‘एसएफआय” (स्टुडंट्स‎फेडरेशन ऑफ इंडिया) या‎विद्यार्थी संघटनेनेही आक्रमक‎पवित्रा घेतला आहे. संघटनेकडून‎राज्यभरात १ सप्टेंबरपासून “शाळा‎वाचवा, शाळा सुधारा’ हे‎आंदोलन छेडले जाणार आहे.‎विविध टप्प्यांत हे आंदोलन केले‎जाणार आहे.‎ नीट पेपरफुटी प्रकरणानंतर‎सीजेपीने केलेले आंदोलन ‎‎गाजल्यानंतर आता सीजेपीने‎स्कूल ठीक करो आंदोलन सुरू‎केले आहे. अभिजित दीपके‎सहकारी देशभरात शाळांना भेटी‎देत आहेत. विविध कारणांनी या ‎‎भेटीही गाजत आहेत. असे ‎‎असतानाच महाराष्ट्रातील सरकारी ‎‎शाळांचे संरक्षण, सक्षमीकरण व ‎‎विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण ‎‎मिळावे या मागणीसाठी स्टुडंट्स‎फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी‎संघटनेने समविचारी संघटना‎डीवायएफआयच्या मदतीने‎राज्यात शाळा वाचवा, शाळा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुधारा आंदोलनाची हाक दिली‎आहे. “विद्यार्थी संख्या कमी आहे‎म्हणून शाळा बंद करणे हा उपाय‎नाही. चांगले शिक्षक, उत्तम‎सुविधा दिल्यास सरकारी शाळांवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण‎होऊ शकतो,’ अशी भूमिका‎संघटनांनी मांडली. १ सप्टेंबरपासून‎या आंदोलनाला सुरुवात होणार‎आहे.‎ अनोखे आंदोलन : जाधव‎ शाळा बंद किंवा विलीन करण्याची‎प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी,‎शिक्षकांची सर्व रिक्त पदे तातडीने‎भरण्यात यावीत, प्रत्येक शाळेचे‎पायाभूत सुविधा ऑडिट करून‎आवश्यक निधी उपलब्ध करून‎द्यावा, शाळांत ग्रंथालय, प्रयोगशाळा,‎डिजिटल सुविधा व शैक्षणिक‎साहित्य पुरवण्यात यावे आदी.‎ या आहेत प्रमुख मागण्या‎ १ सप्टेंबर रोजी जि.प., पं.सं. येथे‎ठिय्या आंदोलन केले जाईल. या‎आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ५‎सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिना”चे‎औचित्य साधून राज्यभरातील‎शासकीय कार्यालयांसमोर अनोखे‎आंदोलन केले जाणार आहे,अशी‎माहिती राज्याध्यक्ष रोहिदास जाधव‎यांनी दिली.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *