![]()
फुलंब्री न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फुलंब्री येथे शुक्रवारी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि जबाबदारीचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे अत्यंत आकर्षक राखीची प्रतिकृती साकारली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या विविध प्रकारच्या राख्या या स्पर्धेत सादर केल्या. उत्कृष्ट राख्या तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ हे होते. तर मुख्याध्यापिका करुणा दांडगे, उपमुख्याध्यापक विल्सन डेव्हिड, शिक्षिका संघप्रिया पैठने, सपना सोनावने, स्वाती खोजे, पल्लवी पुरी, अमृता गवळी, प्रियंका ढेपले, भाग्यश्री खिल्लारे, जयश्री खिल्लारे, भाग्यश्री जंगले, राणी लहाने व कल्पना मिसाळ, प्रकाश मोटे, इम्रान खान, रोशन ओइंबे, योगेश ढेपले, विशाल साठे उपस्थित होते. न्यू ओएसिस स्कूलमध्ये साखळीतून आकर्षक राखी साकारण्यात आली. भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे कर्तव्य जपावे राजेंद्र वाघ म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे कर्तव्य जपावे. भाऊ-बहिणीचे हे नाते अत्यंत अतूट असून हा केवळ धागा नसून बहिणीच्या सुरक्षेचे वचन आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बहिणीप्रमाणेच शाळेत येणाऱ्या सर्व मुलींची काळजी घेतली पाहिजे.
Source link
न्यू ओएसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली राखी