![]()
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने गुरुवारी जळगावात छापा टाकून ५ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये आहे. पोलिसांनी मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. पोलिस उप निरीक्षक उमेश भागवत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहरुण परिसरातील रामनगरातून रहिम ताहेर पिंजारी (वय २८) याला ताब्यात घेतले. त्याने एमडी ड्रग्जचा साठा शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणार सैय्यद मुशादूर अली मुमताज अली (२९, रा. जोशी पेठ, श्री पंत नगर) याच्या घरात ठेवल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा पथकाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पथकाला सोबत घेऊन गुरुवारी पहाटे छापा टाकला. ११ किलोतील ५ किलो एमडी जळगावात आले क्राईम ब्रांच युनिट ४ ने जळगावात छापा टाकण्यापूर्वी मीराभाईंदर परिसरात दाखल एनडीपीएस गुन्ह्यात १४ जणांना ११ किलो एमडीसह अटक करण्यात आली आहे. त्यातील प्रमुख सप्लायरने ५ किलोचा माल जळगावात दिल्याचे कबुल केले होते. याच माहितीवरून जळगावात कारवाई केली.
Source link
जळगावला सव्वा कोटींचे 5 किलो ड्रग्ज जप्त:मीरा-भाईंदरच्या पथकाचा जळगावात छापा; धडक कारवाईत 2 संशयित अटकेत