Headlines

समृद्धी महामार्गावर 16 तासांनंतर गॅस गळती रोखण्यात मिळाले यश:वाहतूक 5 तास बंद, माळीवाडा- हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून वळवली‎




गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी शिवारातील समृद्धी महामार्गालगत गट क्रमांक ८६ मध्ये शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. एमएनजेपीएल या नैसर्गिक गॅस पाइपलाइनच्या मुख्य व्हॉल्व्ह पॉईंटवरील कपलिंग निघाल्यामुळे भीषण गॅस गळती सुरू झाली होती. विविध यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत तब्बल १६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी १० वाजता ही गळती रोखण्यात यश मिळवले आहे. रविवारी सकाळी १० वाजता गळती थांबली : अग्निशामक दल, छत्रपती संभाजीनगर येथील दुरुस्ती पथकासह नागपूर आणि मुंबई येथून कंपनीच्या विशेष मेकॅनिकल पथकांना पाचारण करण्यात आले. शनिवारी रात्री ८ वाजेपासून काम युद्धपातळीवर सुरू झाले. माळीवाडा व हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुमारे ५ तास ठप्प झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *