Headlines

श्रीकृष्णाच्या लीलांतून मोह, लोभाचा त्याग करून मानवतेने जगाचा संदेश:मानूर येथील कीर्तन सप्ताहात प्रकाश महाराज गांगुर्डे यांचे निरुपण‎



भगवान श्रीकृष्णाने विविध लीलांच्या माध्यमातून कुप्रवृत्तीचा नाश करत मानवाला संकटांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याचा आणि हसत-खेळत जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे माणसाने मोह-माया व लोभापासून दूर राहून एकमेकांना सहाय्य करणारे जीवन जगावे, असा

.

श्रीकृष्ण भगवंताचे स्वरूप असतानाही त्यांनी जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय जीवन जगले. अखेर त्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपालाही संघर्षातून जीवन जगावे लागले, हे माणसाने लक्षात ठेवावे, असे प्रकाश महाराज यांनी सांगितले. मोह-मायेच्या प्रेमात न पडता, लोभाच्या मागे न धावता मानवतेच्या भावनेतून एकमेकांना मदत करावी. एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे, ही भावना मनात ठेवून गर्विष्ठ व स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा. स्पर्धेच्या युगात पैशाच्या बळावर ‘मी मोठा की तो मोठा’ अशी तुलना वाढल्याने समाजात अहंकार, हेवेदावे आणि नकारात्मकता वाढत आहे. सख्खा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकत असून संस्कार व नीतिमूल्यांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे गावागावांत कीर्तन सप्ताह आयोजित करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळी जि. प. शाळा, जनता विद्यालय मानूर आणि आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह घोडेस्वार व डोक्यावर तुलसी वृंदावन घेतलेल्या महिलांच्या सहभागाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन सप्ताहात आठ दिवस टाळकरी म्हणून सेवा बजावलेल्या कंधाणे येथील दमोताई वारकरी जीवन शाळेच्या ११ विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. आजची सेवा अशोक पवार यांच्या सहकार्याने झाली.

तीन हजारावर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पालखी मिरवणुकीत विद्यार्थी, घोडेस्वार आणि महिला सहभागी झाल्या. तसेच आठ दिवस टाळकरी म्हणून सेवा बजावलेल्या कंधाणे येथील दमोताई वारकरी जीवन शाळेच्या ११ विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *