![]()
वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवारीही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढली होती, तर दिवसभरात हजारो भाविकांनी श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले आहे. हा तिसरा श्रावण सोमवार
.
भाविकांनी श्री घृष्णेश्वर दर्शनाबरोबरच लेणी पाहण्याचाही आनंद घेतल्याने लेणी परिसरही भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पोलिस प्रशासनाच्या वतीने श्री घृष्णेश्वर मंदिरासह लेणी परिसरातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही तसेच सुरळीत दर्शन होईल, यासाठी संस्थानचे अध्यक्ष यांच्यासह सर्व विश्वस्त व पदाधिकारी प्रयत्नशील होते. दरवर्षी श्रावणात मोठ्या संख्येने भक्त घृष्णेश्वर मंदिरात येतात. रोज सकाळी पाच वाजता भाविकांसाठी मंदिर खुलं होतं. मात्र, श्रावणात रात्री बारापासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांसाठी अनेक ठिकाणी काही भक्त मंडळाकडूनही प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर संस्थानने अचूक नियोजन केले होते॰ शनिवार-रविवार शासकीय सुट्टी आणि तिसरा श्रावण सोमवार याचे औचित्य साधून वेरूळ येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत सुमारे एक ते सव्वा लाख भाविकांनी श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. योगेश टोपरे, कार्यकारी विश्वस्त मंदिर देवस्थान ट्रस्ट या यात्रेनिमित्त वेरूळ येथे प्लास्टिकच्या बाटल्या, पाणी भरण्यासाठी भोपळे, सजवलेल्या काठ्या, रंगीबेरंगी रिबीन, चमकी यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या विक्रीतून स्थानिक व्यापाऱ्यांनी तीन दिवसात लाखो रुपयांची कमाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रम हा मंदिरात केला म्हणजेच अन्नदान तिसरा श्रावण सोमवार असल्याने मंदिरात अन्नदान व प्रसाद वाटपाचा कार्यक्रमही जोरात चालू होता. कावड यात्रा व भाविक यांची गर्दी पाहता मंदिर परिसरात प्रशासनाकडून बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
भाविकांसाठी रात्री बारापासून मंदिर खुले, चोख नियोजन
मंदिर परिसरात पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
सलग तीन दिवस सुटीमुळे भाविकांची झाली गर्दी