Headlines

होमगार्ड कॅम्पसच्या विकासाला नवीन दिशा; रस्त्याच्या कामाचा एसपींच्या हस्ते कार्यारंभ:काम पूर्ण झाल्यानंतर कॅम्पसमधील दळणवळण होणार अधिक सुलभ‎



येथील काँग्रेसनगर रोड स्थित होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळत असून, अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ पोलिस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. होमगार्ड जवानांना प्रशिक्षणाच्या काळात

.

या संपूर्ण विकास प्रक्रियेत केंद्र नायक राम पिंजरकर यांची भूमिकासुद्धा विशेष उल्लेखनीय ठरली आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्डच्या दैनंदिन व्यवस्थेपासून ते परिसरातील विकासकामांपर्यंत विविध बाबींमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. येथील गरजा समजून घेणे, आवश्यक विकासकामांकडे वरिष्ठांचे लक्ष वेधणे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे तसेच कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करणे, यामध्ये राम पिंजरकर यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.

केंद्र नायकांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या प्रभावी समन्वयामुळे विकासकामांना आवश्यक गती मिळत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, केंद्र नायक म्हणून जबाबदारी सांभाळताना प्रशासकीय कामकाजासोबतच प्रत्यक्ष मैदानावरील गरजांची जाण ठेवून काम करण्याची त्यांची कार्यशैली कौतुकास्पद आहे. त्यामुळे होमगार्ड कॅम्पसच्या विकासामध्ये राम पिंजरकर यांचे योगदान निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक यवतकर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट ठाकरे, कंत्राटदार अंकुश मशीनकर समादेशक अधिकारी राठोड, करवाडे, अजय आसोले, तायडे, मनीष जोगी, भुसारी, वैशाली शेलारे, मंडले, बडगे, सिंहाले यांच्याशिवाय भूषण पोटे, कपील धवने, सुधाकर रामटेके, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *