Headlines

जापानच्या कुरे शहरात हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू:एक महिन्यापूर्वीच गेला होता जापानमध्ये, हिंगोली शहरावर शोककळा




जापानच्या कुरे शहरातील कारुगा बीट पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचा संदेश प्राप्त होताच तरुणाच्या कुटुंबासह हिंगोली शहरावर शोककळा पसरली आहे. शाम संतोष अग्रवाल (25) असे या तरुणाचा नांव आहे. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम अग्रवाल हा आयआयटी खरगपूर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. आयआयटी एक्सचेंज कार्यक्रमामध्ये त्याची महाविद्यालयाकडूनच सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानुसार तो मागील महिन्यात जापान मधील हिरोशीमा विद्यापीठामध्ये पोहोचला होता. दरम्यान, एका कॉन्फरंन्ससाठी तो रविवारी ता. 30 जापानधील कुरे शहरात गेला होता. त्यानंतरतेथून तो व त्याचे काही मित्र कारुगा चो येथील बीच पार्कच्या समुद्रकिनारी गेले होते. यावेळी संतोष हा ब्रेकवॉटरवरून पाण्यात उतरला मात्र तो परत वर आलाच नाही. काही वेळानंतर तेथील जीव रक्षकाला एक तरुण पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना सोमवारीता. ३१ मिळाली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाला चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. आता मयत शाम याचा मृतदेह जापान येथून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यासाठी पुढील सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मयत शाम याचे प्राथमिक शिक्षक हिंगोलीच्या एका इंग्रजी शाळेत झाले. त्यांनतर बारावी पर्यंतचे शिक्षण विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर एनआयटी भोपाळ येथे त्याने आर्किटेक्ट अभ्यासक्रमाची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी त्याने आयआयटी खरगपूर येथे प्रवेश घेतला होता. अभ्यासात अतिशय हुशार अन मनमिळावू म्हणून तो मित्रांमध्ये प्रसिध्द होता. मयत शाम याचे कुटुंब काही वर्षापुर्वीच छत्रपती संभाजीनग येथे स्थाईक झाले आहेत. मयत शाम याच्या पश्‍चात वडिल, भाऊ, वहिणी असा परिवार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *