Headlines

ठाकरे बंधूंकडून केवळ हिंदू मतदारांवर आक्षेप; रोहिंग्यांवर गप्प का?:CJP म्हणजे 'काँग्रेस जिताओ पार्टी'; गैर-भाजप राज्यांमधील घोटाळ्यांवर शांत का?– नवनाथ बन




मुंबईतील दुबार मतदारांवर विधानसभेच्या वेळी राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली होती. त्यामधील हिंदू मतदारांवर आक्षेप घेण्याचे काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले होते. अफजल खानांच्या वंशावळी, रोहिंग्याचे मतदान दूर करायचे नाही का? मतदान मिळावे म्हणून तुम्ही हे मतदान अनेक मतदारसंघात घुसवले होते, असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठासह मविआवर केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ पार्टी आहे. अभिजीत दिपकेची धोरणे केवळ भाजपशासित राज्यातच का लागू होतात. झारखंडमध्ये विद्यार्थ्यी आंदोलन करत होत, पंजाबमध्ये पेपरफुटी झाली तिथे सीजेपी का गेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीजेपीबद्दल जे म्हटले ते अगदी योग्य आहे. कर्नाटक, केरळमध्ये हे का जात नाही? काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करायचे नाही केवळ एनडीएच्या विरोधात काम करण्याचे काम सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत:हून राजीनामा दिला कारण त्यांना सीजेपीचे नेपाळसारखी परिस्थिती करायची होत ती होऊ न देण्यासाठीच त्यांनी राजीनामा दिला. राऊत, राहुल गांधींकडून नारीशक्तींचा अपमान नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी आणि संजय राऊत हे महिला आरक्षणाच्या विरोधी आहेत. 2023 मध्ये जे विधेयक हे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन संदर्भात होते. त्यात उल्लेख होता की जनगणनेनंतर आकडेवारी नुसार महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन करणं गरजेचे आहे. 2029 लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण नसावे म्हणून इंडिया आघाडीकडून महिला आरक्षणाला विरोध केला जात आहे. राहुल गांधी आणि संजय राऊत नौटंकी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाबद्दल जे टविट केले ते बरोबर होते, पण त्यानुसार 2034 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल. पण तेच आरक्षण 2029 मध्ये मिळावे यासाठी हे बिल आहे. राऊत, राहुल गांधींकडून नारीशक्तींचा अपमान केला जात आहे. त्या तुम्हाला धडा शिकवतील. देवाभाऊंनी माफियागिरी संपवली नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ हे भाषण माफिया नाही तर संजय राऊत यांच्यासारख्या माफियांचे कर्दनकाळ आहेत. महाराष्ट्रातील माफियागिरी करण्याचे काम देवाभाऊंनी केले आहे. तुम्ही महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करण्याचे काम केले. तुम्ही खिचडी पासून जमीनीपर्यंत सर्व प्रकरणामध्ये माफियागिरी करण्याचे काम केले. तुमच्या सारख्या माफियांची गुंडगिरी संपवण्याचे काम देवाभाऊंनी केले आहे. पत्रकार परिषद घेण्यास काही मर्यादा असतात का नाही नवनाथ बन म्हणाले की, राऊतांकडून रोज सकाळी राहुल गांधी यांचा पोंगा वाजवण्याचे काम केले जात आहे. तुम्ही राहुल गांधींसाठीच रोज सकाळी पत्रकार परिषद घेत असतात. मुख्यमंत्र्यांनी काल तुमच्या भोंग्याचे लक्तर वेशीवर टांगण्याचे काम केले आहे. रोज पत्रकार परिषद घेण्याची काही मर्यादा असते. फडणवीस यांनी फेक नरेटीव्हचा पर्दाफाश केला आहे. राऊतांचा जुगार खेळण्याचा जुनाच धंदा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर हकलणे, पत्राचाळ घोटाळा करण्यात रस आहे, त्यांना जीडीपीपेक्षा अनेक गोष्टीमध्ये पैसा खाणं आणि घोटाळा करणे यात जास्त रस आहे. अनेक देशात युद्ध सुरू असताना सुद्धा आपला देश सक्षमपणे उभा आहे. राऊतांचा जुगार खेळण्याचा जुनाच धंदा आहे.

हे ही वृत्त वाचा

2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!:संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीडीपी वाढीचे आकडे सांगण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, रुपयाची घसरण आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर सरकारने उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी केली. याशिवाय डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण, शिक्षण कार्यालयातील पंतप्रधानांच्या फोटोचा वाद, कुंभमेळा आणि अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित भ्रष्टाचार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च तसेच मराठी भाषा या मुद्द्यांवरही राऊत यांनी भूमिका मांडली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *