![]()
गोवा येथून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2102 विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्याच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विमान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा) परत आणण्यात आले. विमानाने सकाळी 9:16 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच म्हणजे 9:30 वाजता त्याने सुरक्षित लँडिंग केली. Flightradar24 च्या आकडेवारीनुसार, विमान परत फिरताना सुमारे 14 हजार फूट उंचीवर होते. प्रवाशी आणि तांत्रिक बिघाडाची तूर्त माहिती नाही सध्या विमानात किती प्रवासी होते आणि इंजिनमध्ये कोणत्या प्रकारचा तांत्रिक बिघाड झाला, याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. इंडिगोकडूनही या घटनेबाबत सविस्तर अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. प्रवाशांना तांत्रिक बिघाडाची माहिती देण्यात आली नाही. बातमी अपडेट केली जात आहे…
Source link
गोवा-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड:उड्डाण घेतल्यानंतर 14 हजार फूट उंचीवर कळले, गोवा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग