![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालवली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. जरांगे पाटलांनी उपचारासाठी नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीकडे सरकारचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेनंतरही आंदोलन सुरूच असल्याने सरकारकडून पुढील चर्चेसाठी हालचाली सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या भेटीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. आंतरवालीत जनसागर आणि राजकीय पाठिंबा उपोषणाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचे लोंढे सतत दाखल होत आहेत. जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
5-6 सप्टेंबरपासून मुंबईकडे निघा- जरांगे मराठा बांधवांनी आंतरवालीत गर्दी न करता 5-6 सप्टेंबरपासून मुंबईकडे निघावे. मात्र, आझाद मैदानाकडे न जाता मित्र-नातेवाइकांकडे थांबावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 31ऑगस्ट रोजी केले. जरांगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नये-सामंत मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत, भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सामंत म्हणाले की, जरांगेंच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा झाली आहे. जरांगेंशी 24तासांत चर्चा करून मार्ग काढला जाईल. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नयेत. ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणे. मराठा समाजाने आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशीही मुंबईत आंदोलन करू नये यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. लाड म्हणाले, काही अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याच्या जरांगेंच्या तक्रारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. एका समाजाच्या ताटातील काढून दुसऱ्याच्याताटात सरकार देणार नाही- फडणवीस मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सरकार एकाच्या ताटातील काढून दुसऱ्याच्या ताटात देणार नाही.’ मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाची नाराजी ओढवून घेण्याची भाजपची तयारी नाही, असा अप्रत्यक्ष संदेश फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजासाठी सरकारने सर्वाधिक निर्णय घेतले. ‘न्याय सर्वांना; पण कोणाचा हक्क काढून नाही’ ही आगामी भूमिका राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. सरकार दिलेला शब्द पाळणार- शंभुराज देसाई शंभुराज देसाई म्हणाले की, मनोज जरांगे त्यासाठी आग्रही होते, हैदराबाद गॅझेटियरची कॉपी मिळवण्यासाठी खूप त्रास झाला. दिलेला शब्द महायुती पाळणार आहे. ओबीसींचा केवळ वापर करणार का?- हाके प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, शंभुराज देसाई हा माणूस नालायक आहे. मंत्री आणि आमदार यांनी जी शपथ घेतली ती पाळली जात नाही. ओबीसी उपसमितीची बैठक केवळ 2 वेळा झाली आहे. आम्ही काय केवळ मत देण्यासाठी जन्म घेतला आहे का? आम्हाला तुम्ही केवळ वापरून घेणार का असा सवाल हाके यांनी केला आहे.
हे ही वृत्त वाचा
किनवटजवळ भीषण अपघात:दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या जीपची झाडाला धडक; चौघांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर
श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपला सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिपला नाईक तांड्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या दुर्घटनेत तीन भाविकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
Source link