![]()
बेकायदा सावकारी प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 31 लाख 33 हजार रुपयांची वसुली केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी गुरुदीपसिंग उर्फ राजूजगतसिंग मखीजा (वय 63, रा. गुरुवार पेठ) आणि तरविंदरसिंग गुरुनामसिंग व्होरा (वय 58, रा. उंड्री, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका बेकरी व्यावसायिकाने फरासखाना पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बेकरी व्यावसायिक आहेत. त्यांनी व्यवसायासाठी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दल आणि व्याजापोटी त्यांनी वेळोवेळी आरोपींना एकूण 31 लाख 33 हजार रुपये दिले.त्यानंतरही आरोपींनी त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. बनावट कागदपत्रे तयार करून धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात वकिलामार्फत खटला दाखल केला, तसेच व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक लोणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. मतदार यादीत दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने गंडा मतदार यादीत दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वानवडी भागातील साळुंखे विहार रस्त्यावर एका सोसायटीत राहणाऱ्या 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून निवडणूक आयोगातून बोलत असल्याची बतावणी केली. चोरट्यांनी मतदार यादीतील नावात दुरुस्ती करायची असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून ऑनलाइन पद्धतीने 10 लाख रुपये काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात वर्ग करण्यात आली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. डाबेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल:व्यावसायिकाकडून 31 लाखांची वसुली करत जीवे मारण्याची धमकी