![]()
पुण्यातील हडपसर येथील सुरक्षा नगर परिसरात अल्पवयीन मुलाचा वापर करून गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने या प्रकरणी 11 लाख 44 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोपट मारुती पाडुळे (वय 56, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षा नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत एका विधिसंघर्षित बालकासह आणखी एका व्यक्तीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिस हवालदार पल्लवी सागर मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिळाली माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पथक सुरक्षानगर परिसरात गस्त घालत असताना, पोलिस हवालदार पल्लवी मोरे आणि अंमलदार बाळासाहेब सकटे यांना एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. ही व्यक्ती नवीन म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक 11 समोरील मोकळ्या जागेत मोपेडवर थांबली होती आणि तिच्याकडे गांजा असल्याची खबर होती. 21 किलो गांजा जप्त या माहितीनुसार, पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर गांजा पुरवठा करणारा पोपट पाडुळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 21 किलो 180 ग्रॅम गांजासह एकूण 11 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष शेटे, सहायक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, सहायक पोलिस फौजदार ज्ञानेश्वर शिर्के, अंमलदार तानाजी देशमुख, समीर पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते, प्रशांत कर्णवर, पल्लवी मोरे आणि मनीषा लोखंडे यांच्या पथकाने केली.
Source link
पुण्यात अल्पवयीन मुलाचा वापर करून गांजा विक्री:11 लाखांच्या मुद्देमालासह 21 किलो गांजा जप्त