Headlines

Lawyer Dies, Many Injured in Mumbai Road Mishap


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून, एका 35 वर्षीय महिला वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲड. प्रियांका मयंक सत्रा असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील रहिवासी

.

प्राथमिक माहितीनुसार, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोड जंक्शनवर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी कार चालकाला घेतले ताब्यात

कृष्णा शांताराम चमनकर (वय 70) हा चालक आपल्या कारने (MH.02.GJ. 2722) जात असताना, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आणि रिक्षातील प्रवाशांसह 20 जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ॲड. प्रियांका सत्रा यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मालाड पोलिसांनी वाहनचालक कृष्णा चमनकर याला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

कार चालकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125 (अ)(ब) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा नोंद क्रमांक 1469/2026). आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

हे ही वृत्त वाचा मुंबईत भरधाव कारने चिमुरड्याला चिरडलं:वांद्रेपरिसरात भीषण अपघात, महिला चालकाला अटक

वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला चाललेल्या 8 ते 9 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (30 ऑगस्ट ) दुपारी घडली. मेहबूब स्टुडिओ परिसरातील जॉन बॅप्टिस्ट रोडवर झालेल्या या भीषण अपघातात अंश रवींद्र गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी इनोव्हा कारचालक मेघना रावल (45) हिला अटक केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.