![]()
रक्षाबंधन सणाचा पारंपारिक थाट यंदा क्विक कॉमर्सच्या वेगामुळे अधिकच बदलल्याचे चित्र समोर आले आहे. केवळ साध्या रेशमी धाग्यापुरता मर्यादित असलेला हा सण आता मौल्यवान भेटवस्तू आणि डिझायनर राख्यांच्या स्वरूपात साजरा केला जात आहे. इन्स्टामार्टने जाहीर केलेल्या ‘राखी ट्रेंड्स 2026’ अहवालानुसार, यावर्षी ग्राहकांच्या ऑर्डर्समध्ये वर्षाकाठी तब्बल 300% वाढ नोंदवली गेली आहे. सणाच्या काळात शेवटच्या क्षणी खरेदी करणाऱ्यांची झुंबड इतकी प्रचंड होती की 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12:01 वाजता प्रति मिनिट 857 राख्यांच्या ऑर्डर्सचा विक्रम नोंदवला गेला. साध्या धाग्याची जागा लक्झरी डिझाइन्सनी घेतली यंदाच्या सणात साध्या राख्यांऐवजी चांदी, सोन्याचा मुलामा आणि प्रीमियम डिझायनर राख्यांना सर्वाधिक पसंती मिळाली. प्रीमियम राख्या: डिझायनर राख्यांच्या मागणीत 130% वाढ झाली. विशेषतः 925 स्टर्लिंग सिल्व्हर आणि नंतर पेंडंट म्हणून वापरता येणाऱ्या ‘सूर्य’ व ‘त्रिशूळ’ डिझाइन्सची भुरळ ग्राहकांना पडली. गिफ्ट्स आणि गॅजेट्स: भेटवस्तूंच्या हॅम्पर्समध्ये 85% तर स्मार्टवॉचच्या विक्रीत 99% वाढ दिसून आली. मिठाई आणि चॉकलेट्सच्या विक्रीतही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 30% वाढ नोंदवली गेली. लुंबा राख्या: वहिनींसाठी घेतल्या जाणाऱ्या लुंबा राख्यांमध्ये ‘Swarovski’ जडलेल्या डिझाइन्स पहिल्या 3 पैकी 2 स्थानांवर राहिल्या. हैदराबाद देशात प्रथम, मुंबई-पुणेही आघाडीवर राखीच्या ऑर्डर्स नोंदवण्यात हैदराबाद शहर अव्वल ठरले. त्यापाठोपाठ बंगळुरू, मुंबई, दिल्ली, पुणे, गुडगाव, नोएडा, कोलकाता, लखनौ, चेन्नई, भुवनेश्वर आणि विझाग या शहरांनी खरेदीत बाजी मारली. चकित करणाऱ्या काही रंजक ऑर्डर्स: सर्वात वेगवान भाऊ: बंगळुरूच्या एका ग्राहकाने 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ठीक 00:00:11 वाजता ‘Ganesh with beads’ राखी मागवून हंगामातील पहिली ऑर्डर नोंदवली. 118 राख्यांची एकच ऑर्डर: मुंबईतील एका ग्राहकाने एकाच वेळी 118 राख्या कार्टमध्ये जोडून ऑर्डर दिल्याचा अनोखा विक्रम केला. सोन्याची नाणी अन् चांदीचा थाट: बंगळुरूच्या एका खरेदीदाराने 24KT सोन्याच्या नाण्याच्या 5 राख्या खरेदी करण्यासाठी ₹10,995 खर्च केले. तर गुडगावच्या ग्राहकाने ₹10,780 मध्ये 20 प्रीमियम चांदीच्या राख्यांची ऑर्डर दिली. विविधतेचा संग्रह: हैदराबादच्या एका ग्राहकाने ₹9,790 मध्ये 109 विविध प्रकारच्या राख्यांची खरेदी केली. सर्वात महागडे राखी हॅम्पर: गुडगाव येथील एका ग्राहकाने सोन्याची राखी, लक्झरी स्किनकेअर आणि डिझायनर चॉकलेट्ससह तब्बल ₹14,630 किमतीची ‘मेगा कार्ट’ ऑर्डर देऊन यंदाचा उच्चांक गाठला. उत्कृष्ट गुणवत्ता आणि वैविध्यपूर्ण वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या इन्स्टामार्टच्या ‘Switch’ या उपक्रमामुळे यंदाच्या रक्षाबंधनात भारतीयांनी प्रीमियम आणि लक्झरी खरेदीला मनापासून पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
Source link
'धाग्यापासून सोन्या-चांदीच्या राख्यांपर्यंत':इन्स्टामार्टवर राखी ऑर्डर्सचा 300% धमाका; यंदा भारतीयांचा 'प्रीमियम गिफ्टिंग'कडे कल