Headlines

जळगावमधील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या हत्येचा निषेध:नांदेडमध्ये अधिकाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी




जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथील ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभेनंतर झालेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नांदेड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कामकाजादरम्यान सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *