![]()
देवगाव रंगारी | ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला कन्नड पंचायत समिती उपसभापती माया सुराशे यांच्या वतीने ललित सुराशे, गोकुळ गोरे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुनील गोंधळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे ग्रामीण अध्यक्ष सुभाष भायभंग, काकासाहेब सोनवणे, धरम राजमुकुट, प्रकाश गोंधळे, सागर वाडकर, नीलेश गोंधळे, अभिषेक राजमुकुट, सोमीनाथ बरबंडे, विजय सोनवणे, केदार सावजी, संतोष मोरे, अशोक दिवेकर, शांताबाई उपेवाड आदी उपस्थित होते. सुभाष भायभंग यांनी आभार मानले.
Source link
देवगाव रंगारी येथे वीरशैव बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी:सुनील गोंधळे यांनी जीवनचरित्राविषयी माहिती दिली