![]()
साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रे’चे सोमवारी (३१ ऑगस्ट) पवित्र वाराणसी नगरीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. साईंची पालखी हजारो भाविकांसह काशीत दाखल होताच परिसर ‘ओम साई नमो नमः, जय जय
.
यात्रा काशीत पोहोचताच स्थानिक साईभक्त राजेश अरोरा यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साई पालखीची विधिवत महाआरती करण्यात आली. मंत्रोच्चार आणि साईनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, बँड पथकाच्या सुरावटी आणि साईनामाचा जयघोष करीत पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर भक्तांनी नृत्य करीत आनंदोत्सव साजरा केला. शोभायात्रा श्री काशी विश्वनाथ मंदिराकडे मार्गस्थ झाली. काशी विश्वनाथ धाम परिसरात साईभक्तांची मोठी गर्दी झाली होती. यात्रेत सहभागी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. ‘साईबाबा की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यात्रेकरूंच्या सोयीसाठी साई निर्माण ग्रुपच्या वतीने निवास, भोजन आणि दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत महिला व ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग होता. यात्रा यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
साईंची पालखी काशीत दाखल होताच ‘ओम साई नमो नमः’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वाराणसी नगरी दुमदुमून गेली. ढोल-ताशांचा गजर, बँड पथकाच्या सुरावटी आणि हजारो भाविकांची उपस्थिती यामुळे शोभायात्रेला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले. साईभक्ती आणि शिवभक्तीच्या या अनोख्या संगमाने यात्रेकरूंच्या आनंदाला उधाण आले.