![]()
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दशरथ रायकर (रा. संगम, जि. बीड) असे मृत आंदोलकाचे नाव आहे. रायकर हे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत आले होते. बुधवारी रात्री ते येथील एका शेतात झोपले होते. मात्र, आज सकाळी ते उशिरापर्यंत उठले नाहीत. त्यामुळे त्यांना तातडीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपोषणस्थळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत 'बंद'