Headlines

Vidyanand Bapat Attack Pune; Political Leaders React & Slam Government


गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. बापट यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी संतोष चव्हाण याला पोलिसांनी

.

“उत्सवाला गालबोट लावू नका, नागरिकांची गैरसोय नको” – एकनाथ शिंदे

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “गणेशोत्सव ही आपली संस्कृती आणि मोठी परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लागता उत्सव जोपासण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. ज्या कृत्यातून नागरिकांना त्रास होईल किंवा सर्वसामान्यांची गैरसोय होईल, असे काम कोणीही करू नये, हीच सरकारची स्पष्ट भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

वैचारिक मतभेदांना हिंसेने उत्तर देणे लोकशाहीसाठी घातक – सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यानंद बापट यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेचा निषेध केला. “लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मान्य नसले तरी ते मांडण्याच्या अधिकाराचा आदर झालाच पाहिजे.”

“अलीकडच्या काळात विरोधी विचार दडपण्यासाठी दांडगाई आणि मारहाण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असून, ती महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शोभणारी नाही,” असे त्यांनी नमूद केले.

विरोधाचा आवाज ऐकण्याचा उमदेपणा सरकारमध्ये नाही – यशोमती ठाकूर

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. “पुण्यात सजग नागरिक नागरी समस्यांवर बोलतात तेव्हा त्यांना मारहाण होते, हा महायुती सरकारचा करंटेपणा आहे.”

“पुण्यात भाजपचे आमदार, खासदार, पालिकेत सत्ता आणि गृहखातेही फडणवीसांकडे असताना सामान्य पुणेकरांचा आवाज धक्काबुक्की करून दाबला जात आहे. लोकांचे म्हणणे समजून घेण्याची आणि विरोधाचा आवाज ऐकण्याची धमक या सरकारमध्ये उरलेली नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांच्या हल्ला करण्यात आला.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांच्या हल्ला करण्यात आला.

महाशक्तीच्या राजकीय अजेंड्यामुळेच हल्ला – रवींद्र धंगेकर

शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी या हल्ल्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. “मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आणणे चुकीचे आहे. बापट यांना मारहाण करणारे साधे कार्यकर्ते असूच शकत नाहीत.”

“कुठल्यातरी महाशक्तीच्या राजकीय अजेंड्याच्या आड बापट येत असल्यानेच त्यांच्यावर हा सुनियोजित हल्ला करण्यात आला असावा. तुमच्या भूमिकेला विरोध केला की मारहाण करायची, ही वृत्ती पुणेकरांसाठी घातक आहे.”

सरकार पुरस्कृत अतिरेक थांबवा – रोहिणी खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले आहे की नाही? बापट संविधानाला आणि कायद्याला धरून सर्वसामान्यांच्या त्रासावर बोलत आहेत.”

“विचार पटत नसेल तर तो विचारांनी खोडून काढावा; थेट मारहाण करून दहशत माजवणे ही कसली लोकशाही? हा सरकार पुरस्कृत अतिरेक तात्काळ थांबला पाहिजे.”

हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण – रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी हल्लेखोरांवर कडक कलमांनुसार कारवाई करण्याची आणि बापट यांना संरक्षण देण्याची मागणी केली. “बापट यांच्या भूमिकेकडे तार्किक दृष्टीने बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.”

“त्यांच्या भूमिकेला वैचारिक विरोध जरूर करा, पण अशी उघड गुंडगिरी खपवून घेता कामा नये. पोलिसांनी हल्लेखोर गावगुंडांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि बापट यांना संरक्षण द्यावे.”

शांतताप्रिय 95 टक्के पुणेकरांवर झालेला हल्ला – ॲड. असीम सरोदे

ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी या हल्ल्याविरोधात पुणेकरांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. “बापट यांच्यावरील हल्ला हा शांततापूर्ण उत्सवाची मागणी करणाऱ्या आणि गोंगाट नको म्हणणाऱ्या 95 टक्के पुणेकरांवर झालेला हल्ला आहे.”

“मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांप्रमाणे अत्याचारी सहजासहजी हक्क देत नाहीत, तो संघर्ष करून मिळवावा लागतो. आता शांततेने जगण्याच्या हक्कासाठी सामान्य नागरिकांनी पुण्यात सामूहिक मोर्चा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.”

हेही वाचा…

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष गजाआड: पोलिस आयुक्तांचा कठोर कारवाईचा इशारा; आरोपीकडून मारहाणीचे समर्थन

पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे, साऊंड सिस्टीम आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, तो एका स्थानिक गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून, शहरात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची प्रतिक्रिया: मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, झॉम्बीसोबत काय युक्तिवाद करणार? पुन्हा ऐकवले सुभाषित

पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला झाल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एका वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना अचानक एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला चढवला. उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. या हल्ल्यानंतर बापट जराही डगमगले नाहीत; उलट त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर अत्यंत शांतपणे व रोखठोख शब्दांत आपली भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: रोहित पवार, सुषमा अंधारेंकडून संताप व्यक्त, तातडीने पोलिस संरक्षणाची मागणी

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.