![]()
येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकास करण्याच्या प्रक्रियेला आता मोठा वेग आला आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे उद्यान पुढील ४९ वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी आताप
.
संत ज्ञानेश्वर उद्यान, अॅडव्हेंचर पार्क आणि डाऊनस्ट्रीम परिसराच्या एकूण २३२ हेक्टर क्षेत्रात कायापालट करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०९ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून, सध्या त्यातील सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधा, सुशोभीकरण, आकर्षक पायवाटा व नवीन संरचनांची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या विशेष पाठपुराव्यातून या उद्यानासाठी निधी उपलब्ध झाला आहे. कोट्यवधींची विकासकामे सुरू असतानाच दुसरीकडे उद्यानाच्या दैनंदिन देखभालीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या पाटबंधारे विभागाकडे याचे व्यवस्थापन असून, दुर्लक्षामुळे अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
सक्षम यंत्रणा नसलेल्या कंपनीस कंत्राट देऊ नका निविदा भरणाऱ्या ३ कंपन्यांमध्ये पैठणमधील एका व्यक्तीच्या/कंपनीचा समावेश असून, प्रशासकीय पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, संबंधित स्थानिक घटकाकडे उद्यान चालवण्याचा कोणताही पूर्वअनुभव वा सक्षम तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ राजकीय प्रभावापोटी अपात्र कंपनीला हे काम दिले जाऊ नये. उद्यानाच्या दर्जेदार संवर्धनासाठी सक्षम अनुभव असलेल्या कंपनीचीच निवड करावी आणि सुरू असलेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, अशी मागणी उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, पवन लोहिया, बाळू आहेर, संतोष गोबरे आणि बजरंग काळे यांनी केली आहे.
निविदेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाणार Ãसंत ज्ञानेश्वर उद्यान भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी ३ निविदा प्राप्त झाल्या असून यात पैठण येथील एका निविदेचा समावेश आहे. पात्रतेची पडताळणी करून योग्य त्या सक्षम कंपनीलाच काम दिले जाईल. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाणार आहे. त्यानुसार याबाबत कार्यवाही केली जात आहे. – तुषार विसपुते, अभियंता, पाटबंधारे विभाग