![]()
यंदाही डीजेमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सोबत उत्सव शांततेत साजरा करा. कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो. फाटे न फोडता समाजशील व्यक्ती बना. येणारे सर्वच सण शांततेत साजरे करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले
.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. बैठकीत गणेश मंडळांच्या मिरवणुका, विसर्जन मार्ग, वाहतूक व्यवस्था, विद्युत रोषणाई, मंडपांची सुरक्षितता, अग्निशमन व्यवस्था तसेच स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन व संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले. या वेळी या या वेळी अक्कलकोट उपविभागातील अधिकारी, पोलिस अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन आणि गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. किशोर थोरे यांनी केले.
एकाच मंडपात बसतात देवी व पंजे . भेदभाव करु नका, सगळ्यांना समान न्याय द्या, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊयात, दुष्काळ परिस्थिती आहे. सर्व कार्यक्रम एकत्रित करतोय. सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थितपणे पार पाडू, चुकलं तर हक्काने सांगा, असे संजय देशमुख यांनी सांगितले. . विजेच्या तारांवरती घ्यावी. शहरातील खड्डे बुजवून घ्यावे, असे सूर्यकांत बिराजदार, अयुब अत्तार म्हणाले. एकाच मंडपात देवी व पंजे बसतात. हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे.काळजी नसावी सालाबादप्रमाणे अक्कलकोट ची संस्कृती जपला जाईल. .गणपती संपेपर्यंत आरोग्य कडे लक्ष घालावे,तारा आडवू नये. असे अश्फाक बळोरगी म्हणाले.