Headlines

Vidyanand Bapat Attack: Actress Arti Solanki Supports Activist


गणेशोत्सवातील डीजे, ढोल-ताशे आणि वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. डीजेविरोधात भूमिका मांडत असताना बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणावर राजकीय आणि सामाजि

.

आता मराठी अभिनेत्री आरती सोलंकी यांनीही या वादावर सोशल मीडियातून आपली भूमिका मांडली आहे. बापट यांचा मुद्दा डीजे आणि ध्वनी प्रदूषणापुरता आहे; मात्र त्यांचा नेमका मुद्दा न समजून काही जण त्याचा संबंध थेट गणपती आणि गणेशोत्सवाशी जोडत असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे.

आरती सोलंकी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून बापट यांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांच्या भाषाशैलीचाही उल्लेख केला. बापट यांनी डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी, अशी विनंती त्यांनी केली. मात्र, त्याचवेळी बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तुम्ही डीजेबद्दल बोलताय, गणेशोत्सवाबद्दल नाही

आरती सोलंकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बापट हे डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात बोलत आहेत. मात्र, त्यांचा मुद्दा काही लोकांना समजत नसल्यामुळे ते गणपती बाप्पा किंवा गणेशोत्सवाच्या विरोधात बोलत असल्याचा गैरसमज निर्माण होत आहे. त्यांनी बापट यांना उद्देशून, “डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात तुम्ही बोलत आहात. मात्र, समोरच्या लोकांना वाटत आहे की तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल बोलत आहात,” अशा आशयाची भूमिका मांडली.

बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही सोलंकी यांनी निषेध केला. एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी असहमती असेल तर त्याला उत्तर विचारांच्या आणि मुद्द्यांच्या आधारे द्यायला हवे. मारहाण करणे हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही, असा सूर त्यांच्या पोस्टमध्ये आहे.

बापटांच्या मराठीचीही सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या भाषणाची आणि त्यांच्या अस्खलित मराठीचीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना ते वापरत असलेले मराठी शब्द, संदर्भ आणि संस्कृत सुभाषितांमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

बापट यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना संस्कृतमधील एका सुभाषिताचा संदर्भ दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या भाषाशैलीची चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर कौतुकाच्या प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्यावर विनोद आणि मीम्सही तयार केले. गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषण, डीजे आणि नागरिकांना होणारा त्रास या मुद्द्यांवर बापट सातत्याने भूमिका मांडत आहेत. याच भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे असे दोन्ही गट सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

हल्ल्यानंतर वादाला आणखी धार

बापट यांच्यावर माध्यमांशी संवाद साधत असताना हल्ला झाल्यानंतर या विषयाला अधिक राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी हल्ल्याचा निषेध करत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, बापट यांनीही हल्ल्यानंतर आपली भूमिका मागे घेण्यास नकार दिला आहे. डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधातील नागरिकांची चळवळ पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रविवारी पुणे महापालिकेवर प्रस्तावित असलेल्या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डीजेचा मुद्दा आता केवळ ध्वनी प्रदूषणापुरता मर्यादित राहिलेला नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचा सार्वजनिक शांततेचा अधिकार आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत यावरही चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा…

जिवंत राहिलो तर रविवारी मोर्चात नक्की सहभागी होणार!:मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पत्रकार परिषद; डीजे, रोजगार आणि ‘सिटीझन ॲक्टिव्हिझम’वर परखड भाष्य

टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक आणि रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. “माझ्यावर झालेला भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. नरेंद्र दाभोलकरांसारख्या विचारवंतांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर खून झाला होता, त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही; पण जर मी जिवंत राहिलो आणि जाण्याजोग्या परिस्थितीत असेन, तर रविवारी पुण्यात निघणाऱ्या मोर्चात नक्की सहभागी होईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पोलीस संरक्षणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार उघड्यावर पत्रकार परिषद न घेता बंदिस्त जागेत माध्यमांशी संवाद साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.