संजय राऊतांचा प्रवास गाढवावर बसून सुरू आहे हे महाराष्ट्र बघतो आहे. रोज सकाळी गाढवावर बसत गाढवासारखी बडबड करण्याचे काम राऊत करत आहे. कमिशन खाणारे उद्धव ठाकरेंचे सरकार होते. सरकारकडून डीजेबद्दलची भूमिका स्पष्ट आहे, की हिंदूच्या सण आले की त्याला विरोध क
.
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी जीडीपीबाबतीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊतांना ट्रिलियन कसे लिहीता आणि जीडीपी म्हणजे काय हे देखील सांगता येणार नाही आणि ते जीडीपी वाढला नाही म्हणतात. तुम्हाला केवळ मटक्यावर आकडे लावता येतात. 2014 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 13 व्या क्रमाकांवर होती ती आज चौथ्या क्रमांकावर आली आहे हे सर्व जग मान्य करत आहे. पण तुम्हाला ते मान्य करायचे नाही. कारण तुमचे मालक मला अर्थशास्त्रामधील काही कळत नाही, असे म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यात काही कळण्याचे कारण नाही.

ठाकरेंना केवळ थापाच मारता येतात
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे थापेबाज आहेत, लोकांना थापा मारणं इतकेच काम त्यांना करता येते, त्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यातील लोकांना थापा मारल्या, आमदाराकीचा राजीनामा देतो म्हणत थापा मारल्या तो दिला नाही. विधान परिषदेत येणार नाहीची थाप मारत पुन्हा तिथे बसत राहिले. तर पंतप्रधान जनतेला घेऊन चालतात.
राऊतांकडून लाडक्या बहिणींचा अपमान
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत लाडक्या बहिणी आणि जनतेचा अपमान करू नका. मागील वेळेस जनतेचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान केला म्हणूनच जनतेने तुम्हाला निवडून दिले नाही. 80 कोटी जनतेला अन्नधान्य का दिले जात आहे तर त्यांच्यावरचे आर्थिक बर्डन कमी व्हावे म्हणून त्यांना अन्नधान्य दिले जात आहे. त्यांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून अन्नधान्य दिले जाते, त्यांना काही मिळत नाही म्हणून दिले जाते असे नाही हे राऊतांना कळणार नाही. कारण त्यांना वाटते देशाची अवस्था पाकिस्तान अन् बांगलादेश सारखी व्हावी, पण तसे कधीच होणार नाही.
ठाकरेंचे सरकार अभासी होते
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अभासी नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार अभासी होते ते फेसबूकवर चालत होते. आम्ही जनतेमध्ये जात काम करत आहोत. अभिजीत दिपके विष्णूचा अवतार आहे म्हणाले तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का? हिंदू देवदेवतांचे अपमान करू नये. उबाठाकडून सर्वच विकास कामांना विरोध करतात आणि मग वाहतूक कोंडीचा फटका बसला म्हणतात. हे ही वृत्त वाचा
अमित शहांचा खेळ संपला, भाजपमध्ये बंडाळी!:संजय राऊतांचा मोठा दावा, फडणवीसांना दिल्ली दौरे आणि डीजे वादावरूनही सवाल

राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डीजे व लेझर लाइट्सच्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “नागपुरात पोलिस आयुक्तांनी डीजे आणि लेझरवर बंदी घातली, मग पुण्यात वेगळा निर्णय का? हा एका शहरापुरता मर्यादित प्रश्न नसून लोकांच्या आरोग्याशी आणि मानसिक स्वास्थ्याशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात डीजेबंदीचा धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशाचा जीडीपी, भाजपमधील अंतर्गत बंडाळी आणि राष्ट्रीय पातळीवरील संभाव्य राजकीय बदलांवरही रोखठोक भाष्य केले. वाचा सविस्तर