Headlines

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; बोर दहेगाव शेड फाट्यावर रस्ता रोको:नागपूर-मुंबई महामार्गावर 2 किमीच्या वाहनांच्या रांगा




आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या सततच्या वेळकाढू धोरणाविरोधात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी 10 वाजता नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोर दहेगाव शेड फाटा (ता. वैजापूर) येथे लासूरगाव सर्कलमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दोन तास ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. बोर दहेगाव शेड फाट्यावर तब्बल दोन तास हे आंदोलन चालल्याने नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मराठवाड्यातील बांधवांवर अन्याय मराठवाड्यातील मराठा समाज बांधव हे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी आहेत. तरीही त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाचे अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ आणि दिरंगाई करत आहेत,” असा आरोप करत उपस्थितांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि शासनाचा निषेध नोंदवला. प्रशासनाला निवेदन सादर या रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन विक्रम शिंदे, अशोक चव्हाण, नवनाथ शिंदे यांच्यासह लासूरगाव सर्कलमधील मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी रिता पुरी, पोलिस निरीक्षक श्रीमती जगताप व पोलिस निरीक्षक श्री पाडळे यांनी स्वीकारले. यावेळी तलाठी विकास भांडारी, प्रवीण पाटील, दिलवाले, सवालखे यांच्यासह पोलिस अंमलदार पो.हे.कॉ. गोरक्ष, पो.हे.कॉ. पडवळ, पो.हे.कॉ. मेटे, पो.हे.कॉ. नरवडे, पो.हे.कॉ. कांबळे, पो.हे.कॉ. गणेश पाटील आणि वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था राखली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *