Headlines

आई-बाबांनी शिकवले!:'सौभाग्यवती वृंदा मोहन' मालिकेतील अभिनेता संग्राम समेळने व्यक्त केली गुरूंप्रती कृतज्ञता




अभिनयाची आवड आणि जिद्दीच्या बळावर प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता संग्राम समेळ याने शिक्षक दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गुरूंची आठवण जागवली आहे. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या संग्रामसाठी त्याच्या आई-वडिलांपेक्षा मोठा गुरू दुसरा कोणीही नाही. आई-बाबांकडून मिळाला अभिनयाचा वारसा शिक्षणासोबतच बालवयापासून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या संग्रामने आपल्या यशाचे श्रेय पालकांना दिले आहे. संग्राम म्हणाला, “कलाक्षेत्रात टिकून कसे राहायचे आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने कसे सामोरे जायचे, हे बाबांनी शिकवले. प्रत्येकावर मनापासून प्रेम करणे आणि माणसे जोडणे आईकडून शिकायला मिळाले. आयुष्यात संयम ठेवून प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळण्याची कला पत्नीने शिकवली. सेटवरील स्पॉटबॉयपासून सहकलाकारांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असते. थकवा असूनही चेहऱ्यावर हसू ठेवून काम करण्याची ऊर्जा मला या सर्व कलाकारांकडून मिळते,” असे संग्राम आवर्जून सांगतो. हर्षदा खानविलकर यांच्यासोबतचे जिव्हाळ्याचे नाते ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत एकत्र काम केलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याविषयी बोलताना संग्राम भावुक झाला. ताईच्या प्रेमळ स्वभावाबद्दल सांगताना तो म्हणाला, “पहाटे 4:00 किंवा 4:30 वाजता नाईट शूट संपल्यावरही ती फोन करून ‘सुरक्षित पोहोचलास का?’ याची आवर्जून चौकशी करते. दुसऱ्यावर भरभरून प्रेम करून मिळणारे समाधान काय असते, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले. या शिक्षक दिनाला संधी मिळाली, तर तिला परदेशात फिरायला घेऊन जायला मला नक्कीच आवडेल.” ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेत उत्कंठावर्धक वळण सध्या ‘सन मराठी’वरील ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेत मोठा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. वृंदा ही तिच्या मोहनच्या शोधात असून, प्रेक्षकांमध्ये “अभिमन्यूच मोहन आहे का?” अशी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोधातून कोणते सत्य बाहेर येणार हे पाहणे रंजक ठरेल. ही मालिका दररोज रात्री 9:45 वाजता फक्त ‘सन मराठी’वर प्रसारित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *