Headlines

कन्नड समितीच्या सभेत 5 कर्मचाऱ्यांच्या बदली मागणीवर एकाचीच उचलबांगडी:गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी‎



कन्नड पंचायत समितीची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण सभा गुरुवारी उपसभापती माया सुराशे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित यांच्या उपस्थितीत पार पडली. काम न करणाऱ्या व एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पाच कर्मचाऱ्या

.

सभेच्या सुरुवातीलाच गटशिक्षणाधिकारी ओमप्रकाश रामावत हे पूर्वकल्पना न देता रजेवर गेल्याचे समोर आल्याने पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर यांनी प्रास्ताविक करून सभेच्या अजेंड्याचे वाचन केले. या बैठकीत जिल्हा परिषद सर्कलनिहाय विकासकामे आखण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम, सिंचन, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, महावितरण, रोजगार हमी योजना आणि घरकुल या सर्व विभागांतील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या १६२० कामे सुरू असून ३,१२५ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये घरकुलाची १५३२, फळबाग ६८, शेततळी ११, सामाजिक वनीकरण ९ आणि वृक्षलागवडीच्या ६ कामांचा समावेश आहे. वैयक्तिक व सार्वजनिक कामांचे युक्तधारा प्रणालीद्वारे तांत्रिक साहाय्यकांच्या माध्यमातून मॅपिंग करण्याचे स्पष्ट निर्देश प्रभारी गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित यांनी दिले. या प्रसंगी सिद्धेश्वर झाल्टे, शरद जाधव, मुक्तार शहा, माया सुराशे, संतोष करवंदे, लक्ष्मी राठोड, कैकशा पठाण, सुनीता जंगले, मीना पाडसवान या सदस्यांसह कार्यालयीन अधीक्षक मनीषा पाटील, सुनीता जाधव आदी उपस्थित होते.

चिकलठाणला पीएम श्री शाळेतील मुख्याध्यापकपद भरण्याची मागणी पंचायत समिती सदस्य मुक्तार शहा यांनी शिक्षण व महावितरण विभागाच्या कारभारावर बोट ठेवले. त्यांनी चिकलठाण येथील पीएम श्री शाळेतील मुख्याध्यापक पद तातडीने भरण्याची मागणी केली. सदस्य सिद्धेश्वर झाल्टे यांनी जेथपूर येथील तीन प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा आग्रह धरला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाळीव जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश सदस्य शरद जाधव यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *