Headlines

अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी 25 मिनिटांचा मोठा वळसा:पूर्वनियोजन नसल्याने वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना आली भुलभुलैय्याची अनुभूती‎




अहिल्यानगर शहरात दहीहंडीनिमित्त नेप्ती चौक, गंगा उद्यान, दिल्लीगेट परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी प्रमुख मार्ग बंद करून वाहतूक वळवली गेली, परिणामी वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना भुलभुलय्याची अनुभूती आली. दहीहंडीच्या कार्यक्रमांमुळे सायंकाळपासूनच चौकांमध्ये तुफान गर्दी जमा झाली होती. प्रशासनाच्या पूर्वनियोजनाचा अभाव असल्याने ऐनवेळी कोतवाली, तोफखाना व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून मार्ग बदलावे लागले. अनेक प्रमुख रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरात नव्याने आलेल्या वाहनचालकांसह स्थानिकांनाही ‘रस्त्यांचा भुलभुलैय्या’ पार करत मार्गक्रमण करावे लागले. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनधारकांना २५ ते ३० मिनिटे वळसा घालावा लागला. नागरिक आणि वाहनचालक कमालीचे संतापले होते. ^दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. कल्याण रोडवरील वाहतूक केडगावमार्गे वळवल्याने नेप्ती नाका व दिल्ली गेट परिसरातील कोंडी टळली. सर्व प्रमुख चौकांत बॅरिकेड्स आणि पोलीस कर्मचारी तैनात असून, रुग्णवाहिकांसाठी विशेष मार्ग मोकळा ठेवण्यात आला. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू होती. – महेश पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा. रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात तारकपूरहून गुलमोहोर रोडकडे जाणाऱ्या चारचाकी चालकाला गंगा उद्यानातून यु-टर्न घ्यावा लागला. पोलिसांनी वाहतूक सिव्हिल हडकोतून वळवल्याने, रामकरण सारडा हॉस्टेलजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनाची दोन चाके खाली उतरली. त्यामुळे येथे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. नैतिक व कायदेशीर जबाबदारी १. संयुक्त जबाबदारी: सार्वजनिक रस्ते व पदपथ अडवून होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी स्थानिक महापालिका, पोलीस आणि उत्सव आयोजक हे संयुक्तपणे जबाबदार असतात. २. उत्सव मंडळ/आयोजक : परवानग्यांच्या अटींचे तंतोतंत पालन करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे हे आयोजकांचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य असते. ही उपाययोजना करणे गरजेचे १. पर्यायी मार्ग व पोलीस बळ: वाहतूक कोंडी झाल्यास तत्काळ पर्यायी मार्ग आखून चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करावेत. २. दंडात्मक व फौजदारी कारवाई : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अनधिकृत रस्ता अडवणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी. ३. स्वयंसेवक व देखरेख: आयोजकांना स्वतःचे स्वयंसेवक नियुक्त करणे बंधनकारक करून सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवावे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेप्तीनाका, दिल्लीगेट येथे वाहतूक कोंडी झाली होती. अशी स्थिती मिस्किन मळा परिसरातही होती. दुचाकीस्वाराची अशी झाली अडचण कल्याण रोडहून आलेल्या एका दुचाकीस्वाराला नेप्ती चौक ते सावेडी जायचे होते. परंतु, नेप्ती चौकातील भीषण कोंडीमुळे त्यांना आयुर्वेद कॉलेज, माळीवाडा वेस, कापड बाजार व सर्जेपुरामार्गे वळसा घालावा लागला. यामुळे १० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल २५ मिनिटे लागली. सिव्हिल हडकोत नुकतेच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचा अंदाज न आल्याने कारची चाके रस्त्याच्या खाली उतरली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *