Headlines

शिक्षकांच्या शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषद निधी देणार- मंत्री विखे:शिक्षणातील गुंतवणूक वाढवून अहिल्यानगरला प्रथम क्रमांकावर नेणार‎




प्राथमिक शिक्षणात गुंतवणूक वाढवून अहिल्यानगर जिल्ह्याचे शैक्षणिक क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास आ. किशोर दराडे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नगराध्यक्ष जयश्री थोरात, डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, अण्णासाहेब कडू, मकरंद गुणे, विजय लगड, प्रकल्प संचालक मंजूषा देवकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षणातील गुणवत्तेमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय विद्यालय प्रवेशामध्ये शिक्षकांच्या योगदानामुळे उल्लेखनीय यश मिळाले आहे. जिल्हा परिषद शाळा ही ज्ञानमंदिरे असून, बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धती स्वीकारण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी मागील वर्षापासून एक कोटी रुपयांचा निधी दिला असून, आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी इस्रोपर्यंत पोहोचले आहेत; आता त्यांना नासापर्यंत नेण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. कोविडनंतर ऑनलाइन शिक्षण वाढले असले तरी समाजमाध्यमांच्या दुष्परिणामांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा शैक्षणिक नवोपक्रमासाठी सकारात्मक वापर करावा. डिजिटल शिक्षणात जिल्हा परिषद मागे राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळांतील शौचालय स्वच्छतेसाठी मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांची समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली. स्वच्छतेबाबत जागरूकता ठेवण्याची गरजही व्यक्त करुन शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी केली. जिल्ह्यातील शाळा खोल्यांची कामे पूर्ण झाली असून, प्रत्येक शाळेला शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुढील वर्षापर्यंत शंभर टक्के शाळांना शौचालये उपलब्ध करून देण्याचा निर्धार मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. शाळांना शौचालयांसाठी ९ कोटी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *