Headlines

'गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील':राज ठाकरेंच्या दाव्याला आदित्य ठाकरेंचाही दुजोरा, काय म्हणाले ठाकरे?




गणेशोत्सवादरम्यान लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दंगली घडवल्या जातील, या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या खळबळजनक दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सण जवळ आलेला असताना आणि डीजेसारख्या मुद्द्यांवरून आधीच वाद सुरू असताना आलेल्या या वक्तव्याला आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही उघडपणे दुजोरा दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्याशी पूर्ण सहमती दर्शवत, आदित्य ठाकरे यांनी काही उदाहरणांचा दाखला देत या संभाव्य परिस्थितीवरून थेट सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या मुलुंड पूर्व परिसरात भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. या अभियानात युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष सहभागी होत उपस्थितांना एक व्हिडिओ दाखवला. ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून कशाप्रकारे येथील मैदानं हडपण्याचा डाव असल्याचे आदित्य यांनी सांगितले. तसेच, मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, आदित्य यांनीही काकांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. भाजपच्या विरोधात देश एकत्र आला आदित्य ठाकरे म्हणाले, मी आमच्या तिकडच्या मुलांना भेटायला जेव्हा रात्री लालबागला गेलो होतो, सगळ्यांकडून जे काही कळते ते असे आहे, कुठेतरी षडयंत्र दिसत आहे. हे जे जेन झी एकत्र आली आहे, जात पात धर्म प्रांत सगळे बाजूला ठेवून देश एकत्र आला. कुठेतरी भाजपच्या विरोधात देश एकत्र आला आहे. त्यामुळे, दंगली घडवून त्यांना हा धार्मिक वाद निर्माण करायचा आहे, असे ठाकरेंनी म्हटले. भाजपकडून दोन्ही जागा पेट्रोल पंपच्या नावाखाली ढापल्या पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मिहीर कोटेचा सरकारच्या आरक्षित भूखंडावर, पेट्रोल पंप आणि डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्स करत आहेत. त्यामुळे, आजपासून आमची मोहीम सुरू झाली आहे, मुंबईमध्ये जिथे जिथे भाजप मोकळ्या जागा ढापत आहे. आपण पाहिले असाल बांद्रामध्ये आम्ही नेव्हिल डिसोजा ग्राउंड वाचवण्यासाठी रेड कार्ड आंदोलन केला होते, आज इथे मुलुंडमध्ये मागच्या दोन आठवडापूर्वी मी आलो होतो. पेट्रोल पंप आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. तरी देखील भाजपकडून दोन्ही जागा पेट्रोल पंपच्या नावाखाली ढापल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार मिहीर कोटेचा खोटे बोलतात तसेच आजपासून आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, खोटेचा याचा राजीनामा घेण्यासाठी. आमदार मिहीर कोटेचा खोटे बोलतात, लोकांसमोर एवढे खोटे ते बोलले आहेत. मी आज लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून एव्हिडन्स दाखवले, त्यात कोटेजा किती खोटे बोलत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *