![]()
शहरातील गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डीजेमुक्त करा. गणेश मंडळे आणि नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी शेवटचे पाच दिवस देखावे मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन हॉलमध्ये आयोजित शांतता समिती बैठकीत केल्या. डीजेला बंदी केल्याने काही जणांची नाराजी झाली. पण डीजे बंदीमुळे झांज पथक, आकर्षक मानवी देखाव्यांचा सहभाग वाढत आहे. ही बाब कुठल्याही उत्सवासाठी महत्त्वाची बाब आहे, असे शिरसाट म्हणाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी परजिल्ह्यातून येणाऱ्या डीजेसाठी नाकेबंदी केली जाईल. काही लोकांनी शहरातही डीजेच्या गाड्या बनवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करू. शहराने हेल्मेटची स्वीकृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुठलीही अडचण सोडवण्यासाठी तत्पर आहेत, तर त्याही पुढे थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. डीजे बंदीची घोषणा होताच दरवाजे ठोकले डीजे बंदीचे फर्मान सोडताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. आपले प्रश्न न ऐकता अटी लादल्या जाताहेत, असे म्हणत कार्यकर्ते सभागृहाबाहेर पडले. बैठकीनंतर बाहेर पडलेल्या पोलिस आयुक्तांना त्यांनी घेराव घातला. यंदा २ बेस, २ टॉपची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. ‘दिव्य मराठी’च्या सर्वेक्षणातही डीजेमुक्तीच ‘दिव्य मराठी’ने गेल्या दोन दिवसांत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ६२.७ टक्के नागरिकांनी डीजेला परवानगी देण्यास विरोध दर्शवला आहे. शांतता समितीच्या बैठकीतही डीजे बंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे. डीजेचा पायंडा मोडला आणि पुन्हा मागणी मागील वर्षी गणेशोत्सवात डीजेमुक्ती करत संभाजीनगरने राज्यासमोर एक आदर्श पायंडा पाडला. मात्र, शिवजयंती आणि भीमजयंतीत हा नियम मोडला. आता आगामी गणेशोत्सवासाठी काही सार्वजनिक मंडळांकडून डीजेला परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Source link
संभाजीनगरात यंदाही गणेशोत्सवात डीजेबंदी:शांतता समितीचा निर्णय, डीजेचालकांचा पोलिस आयुक्तांना घेराव